India Pakistan War: स्वागत नहीं करोगे हमारा! भारताच्या INS विक्रांतची एन्ट्री, पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं!
India Pakistan War: पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले.

India Pakistan War: भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan War) रात्रभर मोठा दणका दिला. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारतानं पाकिस्तानला कराचीत (Karachi Port) देखील मोठा दणका दिला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची (Karachi) बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. तसेच कराची बंदराचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितलं जात आहे. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.
भारताने पाकिस्तानची तीन विमानं पाडली-
भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय. भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केली. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ 17 आणि अमेरिकेच्या एका एफ 16 विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला. भारतानं तीन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ 16 विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत. त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार ते पाहायचंय.
आयएनएस विक्रांत गेम चेंजर-
आयएनएस विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले एमआयजी-29के लढाऊ विमान 850 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्यात 64 बराक आणि 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत, जी हवेत आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. ही जेट्स आणि क्षेपणास्त्रे काही मिनिटांत पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे नष्ट करू शकतात. जर आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते. उपग्रह प्रतिमांनुसार, पाकिस्तानकडे फक्त दोन जुन्या पाणबुड्या आहेत, ज्या आयएनएस विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत, उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत. जर युद्ध झाले तर आयएनएस विक्रांत गेम चेंजर ठरेल.
आयएनएस विक्रांत (IAC-1) ची महत्वपूर्ण माहिती
- प्रकार: विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier)
- निर्मिती: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Ltd., केरळ)
- देशी बनावट: ही भारतात पूर्णतः तयार झालेली पहिली विमानवाहू जहाज आहे.
- लांबी: सुमारे 262 मीटर
- वजन: 45,000 टन
- गती: 28 नॉट्स (सुमारे 52 किमी/तास)
- एअर विंग: मिग-29के फायटर जेट्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स, तसेच हलके हेलिकॉप्टर्स
- प्रवेश (Commissioned): 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलात समाविष्ट झाला.
- ऐतिहासिक पार्श्वभूमी:
- आयएनएस विक्रांत हे नाव याआधी 1961 मध्ये खरेदी केलेल्या ब्रिटीश-निर्मित युद्धनौकेलाही दिले होते, जिचा वापर 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात केला गेला होता.
- नवीन विक्रांत (IAC-1) हे त्याच परंपरेला पुढे नेणारे युद्धनौके आहे.
- ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- भारत हे विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या निवडक देशांपैकी एक बनले आहे.
- यामुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर व प्रदेशातील ताकद वाढली आहे.
























