एक्स्प्लोर

India Alliance : झारखंडमध्ये इंडिया आघाडी शक्तीप्रदर्शन करणार; राहुल गांधी, लालूप्रसाद, अखिलेश यादव अन् सुनीता केजरीवाल एकत्र येणार

India Alliance : या रॅलीत केजरीवाल आणि सोरेन यांना ईडीने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे मानले जात आहे. ईडी सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केला आहे.

India Alliance : झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये (Ranchi) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) 'उलगुलान न्याय रॅली' (Ulgulan Rally) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश असलेल्या 14 राजकीय पक्षांचे नेते यात सहभागी होणार आहेत. या रॅलीचे नेतृत्व झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) करत आहे.

रांचीच्या प्रभात तारा मैदानावर होणाऱ्या या मेगा रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झामुमो नेते हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत केजरीवाल आणि सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे मानले जात आहे. ईडी सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केला आहे.

झारखंडमध्ये विरोधक 14 जागा लढवणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत असतानाच 'उलगुलान न्याय रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे झारखंडमधील 14 जागांवर विरोधकही जनतेला आकर्षित करण्याचे काम करणार आहेत. रांची येथे होणाऱ्या या रॅलीआधीच, इंडिया अलायन्सने 31 मार्च रोजी राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर अशाच प्रकारची सभा संबोधित केली आहे. या रॅलींद्वारे विरोधकही सरकारविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रॅलीच्या माध्यमातून विरोधकांची योजना काय?

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी या रॅलीच्या माध्यमातून आदिवासी आणि आदिवासींवर सरकारकडून होत असलेल्या अत्याचारांचा पर्दाफाश केला जाईल, असे म्हटले आहे. आदिवासींना त्यांच्या जंगलातून आणि जमिनीतून हाकलून देण्याचे षडयंत्र कसे रचले जात आहे, हे जनतेला सांगितले जाईल. विरोधी पक्षांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा मुद्दाही उपस्थित केला जाईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात जनता सरकारला उत्तर देणार आहे.

अन्य कोणते नेते सामील होणार? 

काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जू खर्गे आणि राहुल यांच्याशिवाय पक्षाचे राज्यस्तरीय नेते यात सहभागी होणार आहेत. या रॅलीत झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, अखिलेश यादव, लालू यादव आदी नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीत टीएमसीचे डेरेक ओब्रायन, शिवसेनेच्या (यूबीटी) प्रियांका चतुर्वेदी, सीपीआय (एमएल) मधील दिपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेते दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : विधानसभेत 20-20 खेळलो आणि विश्वचषक जिंकलोKalyan Crime : कल्याणमध्ये अत्याचारानंतर हत्या, आरोपीवर राजकीय वरदहस्त, नागरिकांचा मूक मोर्चाTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP MajhaDevendra Fadnavis on Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवू इच्छितो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Embed widget