Independence Day LIVE UPDATES | पुणे - शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द करुन मुंबईला रवाना
आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या महत्वाच्या घडामोडी आणि ताजे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालकिल्ल्यावरील सोहळा देखील खबरदारी घेत साजरा होणा आहे.
दरम्यान 74 व्या स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. गलवान खोऱ्यात देशासाठी बलदान देणाऱ्या पराक्रमी जवानांना त्यांनी नमन केले. आपल्या सीमेचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी झटणारे सैन्य दल, पोलीस आणि निमलष्करी दलांचा आम्हाला अभिमान आहे.” असंही कोविंद यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं ते म्हणाले.























