Independence Day 2022 : पाकव्याप्त काश्मीर सीमेजवळील भारतीय गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरात; गावातील प्रत्येक घरावर तिरंगा
Independence Day 2022 : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.
Independence Day 2022 : यावर्षी भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबवले जात आहे. असाच एक उपक्रम पाकव्याप्त काश्मीर सीमेजवळील गावात राबविण्यात आला.
उत्तर काश्मीरमील गग्गर हिल (Gaggar Hill village) हे गाव भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असलेलं हे गाव आहे. या गावातील नागरिकांना लागणाऱ्या बहुतांश गरजेच्या वस्तू आपल्या गावातच तयार करतात. देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गग्गर हिल या गावात 6 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' मोहीमे अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लहान मुलांबरोबर ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यांच्या या मोहीमेला सलाम करत भारतीय सैन्यांनीही त्यांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या हातात देशाचा राष्ट्रध्वज फडकताना दिसला. तसेच प्रत्येक घरावर देशाचा तिरंगा फडकत होता. देशाच्या नकाशावर हे गाव जरी छोटं दिसत असलं तरी या लोकांना देशाबदद्ल खूप अभिमान आहे हे यावेळी दिसून आले.
काश्मीरमध्ये जिथे एकीकडे दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच ठिकाणी अगदी POK जवळ असलेल्या या गावामध्ये यावेळी प्रत्येकाच्या मनात देशभक्ती आणि आपल्या देशाप्रती अभिमान पाहायला मिळाला. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे की, "ध्वज हा राष्ट्रासाठी सर्वात आवश्यक आहे. त्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे."
हर घर तिरंगा उपक्रम :
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे स्वातंत्र्याच अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सूचना देखील केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :