देशातील वाघांची संख्या वाढली, व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती
Project Tiger: देशात आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे.
Counting Of tiger: गेल्या अनेक महिन्यांपासून देशातली वाघांची संख्येची मोजणी करण्याचे सुरू असलेले काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज देशातील वाघांच्या संख्येत वाढ झालेली नवीन आकडेवारी समोर आली आहे. व्याघ्र प्रकल्पाला (Project Tiger) सुरू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्हैसूरमध्ये (Maisuru) एका मेगा इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 9 एप्रिल रोजी नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. या नवीन आकडेवारीनुसार, देशातील वाघांची संख्या (counting of tiger) 3,000 हजार पार झाली असून ती (Indian tiger) 3,167 इतकी झाली आहे.
यापूर्वी देशात पन्नास वर्षापूर्वी वाघांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. ते वर्ष होतं 1 एप्रिल, 1973. यो मोहीमेला प्रोजेक्ट टायगर (tiger project) असं नाव देण्यात आले होते. तेव्हापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे, असे समजतंय.
अशी मोजली जाते वाघांची संख्या
प्रोजेक्ट टायगरच्या सुरूवातीला नऊ व्याघ्र आरक्षित करण्यात आले होते. आज पन्नास वर्षानंतर 53 व्याघ्र प्रकल्प आरक्षित आहेत. यासाठी 75, 000 हजार वर्ग किमीचा परिसर कव्हर केलेला आहे. इतक्या दूरपर्यंत पसरलेल्या परिसरात वाघांची मोजणी करणे इतके सोपे काम नक्कीच नाही. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने टायगर प्रोजेक्टला सुरूवात झाली. 1973 मध्ये प्रोजेक्ट सुरूवात झाली तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघांच्या पायांच्या ठसे ओळखण्यासाठी ग्लास आणि बटर पेपरचा उपयोग केला होता. माणसासारखेच वाघाचाही स्वत: एक युनिक फुटप्रिंट असतो. यामुळे वाघांना नेमकं ट्रॅक करण्यास मदत होते. यासाठी फॉरेस्ट रेंजर्स वाघांच्या पायांचे ठसे अचूकपणे शोधून काढतात आणि भविष्यात त्या वाघाला ट्रॅक करण्यासाठी बटर पेपरवर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असतात. अर्थात, हे इतके सोपे काम नाही. कारण वाघ उभा असताना, धावत असताना आणि आराम करत असतानाच्या स्थितीत त्याच्या पायांचे ठश्यांत फरक पडत असतो. त्यामुळे हे वाघांचे ठसे ट्रॅक करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच लागतात.
काळानुरूप वाघांची संख्या मोजण्याच्या पध्दतीत बदल
अनेक वर्षांच्या सरावानंतर वाघांना मोजण्याच्या पध्दतीत बदल आणि विकास झाला. यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅप्चर-मार्क-अॅण्ड-रिकॅप्चर पद्धतीचा वापर करू लागले. या पध्दतीनुसार, मोठ्या प्रमाणावर सॅम्पल जमा केले जातात. या आधारावर वाघांच्या संख्येचा अंदाज घेऊन नोंदणी केली जाते. यानंतर त्यांच्यावर कोणतेही नुकसान न करणारे ठसे लावून पुन्हा त्यांच्या समूहात सोडण्यात येते. यानंतर एका छोट्या समूहाला पकडून त्यांचे ठशांची नोंदणी केली जाते.