एक्स्प्लोर
आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ नाहीच, सीबीडीटीचं स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून देखील ही मागणी होत आहे. पण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने मुदतवाढीला स्पष्ट नकार दिला आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध व्यापारी संघटना आणि त्यांचे चार्टर्ड अकाऊंटन्ट यांच्याकडून देखील ही मागणी होत आहे. पण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने मुदतवाढीला स्पष्ट नकार दिला आहे.
सीबीडीटीने शनिवारी आयटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात स्पष्ट नकार देताना, आयकर रिटर्न 31 जुलैपर्यंतच भरावे लागतील, असं स्पष्ट म्हणलं आहे. याच्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचंही सीबीडीटीनं यावेळी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आतापर्यंत 2 कोटी करदात्यांनी ऑनलाई पद्धतीनं रिटर्न फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केलीय. यावेळी रिटर्न फाईल करताना 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरली असल्यास, त्याची माहिती द्यावी लागणार आहे.There is no proposal to extend date of filing return.All tax payers should file returns in time. Last date of filing return is 31 July: CBDT
— ANI (@ANI_news) July 29, 2017
आयटी रिटर्न वेळेत न भरण्यानं होणारं नुकसान
- जर नोटाबंदीनंतर म्हणजे 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 मध्ये एखाद्याच्या खात्यावर 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल, तर त्या खातेदाराला आयकर रिटर्न भरावे लागतील. जर तुम्ही आयकर रिटर्न 31 जुलै अखेर भरले नाहीत, तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.
- जर 31 जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत. तर संबंधित व्यक्तीला अॅडव्हान्स टॅक्स/ टीडीसीवर एप्रिल ते जुलैपर्यंत व्याज मिळणार नाही.
- याशिवाय आयकर रिटर्न भरण्यास विलंब झाला, तर उद्योग, संपत्ती, गुंतवणूक आणि इतर स्रोतामुळे होणाऱ्या नुकसानीचा वार्षिक ताळेबंद (बॅलेन्सशिट) मध्ये दाखवता येणार नाही. म्हणजे, जर तुम्हाला तुमच्या गेल्या आर्थिक वर्षात नुकसान झालं असेल, तर ते पुढील आर्थिक वर्षात कॅरी फॉरवर्ड (पुढे) दाखवता येणार नाही. जर यासंबंधातील सर्व करांचा तुम्ही वेळेत भरणा केला असेल, तरीही तुम्हाला नंतर ते दाखवता येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement