Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 1 हजार 190 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील 24 तासात देशात 1 हजार 190 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील 24 तासात देशात 1 हजार 190 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही 4 कोटी 46 लाख 55 हजार 828 वर पोहोचली आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 16 हजार 243 वर आली आहे. तर आत्तापर्यंत देशात कोरोनामुळं 5 लाख 30 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
आतापर्यंत 219.66 कोटी लसींचे डोस देण्यात आले
सध्या देशात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 16 हजार 243 वर आली आहे. जी एकूण प्रकरणांच्या 0.04 टक्के आहे. गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 हजार 375 ने घट झाली आहे. त्याचवेळी, रुग्णांचा बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा 98.78 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 9 हजार 133 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूचं प्रमाण हे 1.18 टक्के आहे. त्याचवेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 219.66 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.
With 1,190 fresh cases, India's COVID-19 tally climbs to 4,46,55,828, death toll goes up to 5,30,452: Union health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2022
मुंबईत 18 दिवसानंतर कोरोनामुळं एका रुग्णाचा मृत्यू
मंगळवारी मुंबईत (Mumbai) 83 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत 18 दिवसांनंतर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत कोरोनामुळं 19 हजार 739 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली आहे. कारण यापूर्वी मुंबईत रविवारी आणि सोमवारी अनुक्रमे 84 आणि 85 रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासात कोरोना संसर्गातून 31 रुग्ण बरे झाले आहेत आता शहरात 580 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यामुळं आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ही 11 लाख 33 हजार 763 वर पोहोचली आहे.
कोविड-19 पसरतो कसा?
जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं आहे की, कोविड 19 हा कोरोना विषाणू ( Sars CoV 2 ) हा हवेतून पसरतो. कोविड 19 ( Covid 19) हा प्रामुख्याने वॉटर ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो, असं मानलं जात होतं. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासोबत संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीद्वारे कोरोना विषाणू पसरतो, असं आतापर्यंत मानलं जातं होतं. पण आता एका संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणू हवेतून पसरतो, यावर जागतिक आरोग्य संघटनेनंही शिक्कामोर्तब केला आहे.