एक्स्प्लोर

व्यभिचार गुन्हा नाही, वडिलांचा निवाडा 33 वर्षांनी मुलाने बदलला!

33 वर्षांपूर्वी धनंजय चंद्रचूड यांच्या वडिलांनी म्हणजे तत्कालीन सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांनी व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं कलम कायम ठेवलं होतं.

नवी दिल्ली : व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं 158 वर्षे जुनं कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला. या पाच न्यायमूर्तींमध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. खानविलकर, न्या. रोहिंटन नरीमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. यापैकी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत एक योगायोग घडला आहे. 33 वर्षांपूर्वी धनंजय चंद्रचूड यांच्या वडिलांनी म्हणजे तत्कालीन सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांनी व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं कलम कायम ठेवलं होतं. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी आपल्याच वडिलांनी दिलेला निकाल 33 वर्षांच्या कालावधीनंतर बदलला. न्या. वाय व्ही चंद्रचूड यांनी 1985 मध्ये व्यभिचाराला गुन्हा ठरवलं होतं, मात्र त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने व्यभिचार गुन्हा नसल्याचा निकाल आज दिला. घटनापीठातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकाल लिहिला. कलम 497 मध्ये लैंगिक भेदाभेद होत असल्याचं सांगत लग्नसंस्थेत महिलेला असमान जोडीदार मानलं जात असल्याचं न्या. चंद्रचूड यांनी अधोरेखित केलं. विवाहानंतर महिलेची लैंगिक स्वायत्तता तिच्या पतीला दिली जात नाही. म्हणजेच पती हा पत्नीचा मालक नसतो. त्यामुळे अशी पितृसत्ताक विचारसरणी असलेला कायदा कायम ठेवला जाऊ शकत नसल्याचंही न्या. चंद्रचूड यांनी सांगितलं. 1985 मध्ये सौमित्री विष्णू विरुद्ध भारत सरकार असा हा खटला होता. त्यावेळी तत्कालीन सरन्यायाधीश वाय वी चंद्रचूड यांनी भारतीय दंडविधानातील कलम 497 च्या वैधतेला पुष्टी दिली होती. कलम रद्द केल्यास स्वैराचार आणि विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ होण्याची भीती त्यांनी वर्तवली होती. 'समाजाच्या दृष्टिकोनातून विचार करता मर्यादित वर्गातील व्यभिचारी संबंध कायद्याने शिक्षेस पात्र ठरतील, ही चांगली गोष्ट आहे' असं मत तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही  न्या. धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या वडिलांनी दिलेला निकाल बदलला होता. गोपनीयतेच्या अधिकाराच्या खटल्यात न्या. धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या वडिलांनी एडीएम जबलपूर केसमध्ये दिलेला निकाल पालटला. 1976 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी वाय व्ही चंद्रचूड पाच न्यायमूर्तींपैकी एक होते. व्यभिचार कायदा प्रकरण काय आहे? विवाहित महिलेशी तिच्या पतीच्या सहमतीशिवाय दुसऱ्या विवाहित पुरुषानं शारीरिक संबंध ठेवणं व्यभिचाराच्या कक्षेत येते. भारतीय दंडसहितेच्या कलम 497 नुसार दोषी विवाहित पुरुषाविरुद्ध व्यभिचाराची तक्रार दाखल होऊ शकत होती. केवळ पुरुषालाच दोषी मानणाऱ्या आणि विवाहित महिलेला दुष्कर्माची शिकार अर्थात पीडित मानणारा कायदा बदलण्याची याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. इटलीत राहणाऱ्या भारतीय नागरिकाने न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. या कायद्यानुसार, विवाहबाह्य संबंधाचं कारण देत पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकतो, पण तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही. स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव करणारे कलम रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget