एक्स्प्लोर

IMD Weather Update : विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय, देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

IMD Weather Update : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

IMD Weather Update :  सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) पुन्हा आगमनाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले असून, दमट उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोणकोणत्या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

G-20 परिषदेदरम्यान दिल्लीतील हवामान कसे असेल?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर राजधानीत जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, आयएमडीने 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर, हवामान विभागाने दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 36-38 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 26-28 अंशांच्या दरम्यान राहणार आहे असे सांगितले आहे.

उत्तर प्रदेश-उत्तराखंडसह आज कुठे पाऊस पडणार ?

उत्तर प्रदेशातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी (8 सप्टेंबर रोजी) पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडला. त्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. 

याबरोबरच आज, शुक्रवारी उत्तराखंडमधील डेहराडूनसह पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डेहराडून, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनितालमध्ये हवामानशास्त्राकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD नुसार, टिहरी, पौरी आणि चंपावतच्या काही भागांत हलका पाऊसही पडू शकतो. 

पावसामुळे नागरिकांना दिलासा 

राजस्थानमध्ये बराच वेळ पाऊस न पडल्याने येथील हवामानातही बदल झाला आहे. जयपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, मध्य प्रदेशातही पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील सुमारे 30 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. 

मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

UIDAI New Circular: मुदत वाढवली... आधार अपडेट करण्यासाठी आता 14 डिसेंबरपर्यंतची मुदत अन् पूर्णपणे मोफत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
Devendra Fadnavis at Davos: देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
Embed widget