एक्स्प्लोर

IMD Weather Update : उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकसह 'या' राज्यांत पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वाचा IMD चा अंदाज

IMD Weather Update : राजधानी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.

IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालं आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीतही शनिवारी (काल) पावसानंतर वातावरणात बदल झाला असून येथेही आज पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

याशिवाय देशाच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. याशिवाय मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्येही चांगला पाऊस पडला आहे. 

आज दिल्लीतील हवामान कसे असेल?

राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. एवढेच नाही तर, आज (रविवार) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD नुसार, रविवारी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, राजधानीत पुढील दोन दिवस रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असून रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी सतत पाऊस पडणार आहे.

उत्तर प्रदेश-उत्तराखंडमध्ये हवामान कसे असेल?

यूपीमध्येही शनिवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील बस्ती, गोंडा, श्रावस्ती, बहराइच, बाराबंकी, रायबरेली आणि इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. 

उत्तराखंडमध्येही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. डेहराडून, पिथौरागढ, बागेश्वर आणि नैनितालमध्ये विजांच्या कडकडाटांंसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडूच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून उर्वरित देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope 11 September to 17 September 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group Yuti: मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 

व्हिडीओ

Keral Crime News : सोशल मिडियावरच्या व्हिडीओने घतला जीव, व्हायरल व्हिडिओ ठरला आत्महत्येचं कारण
Anant Ambani Watch : अनंत अंबानींसाठी तब्बल १४ कोटींंचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य? Special Report
Shanivarwada:पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report
Vishal Bhardwaj on Nana Patekar : वेळ पाळत नाय, नानाचा काढता पाय! Special Report
Narayan kuche Audio Clip : कुचेंचा व्हिप लक्ष्मीदर्शनाची क्लिप; पैसे वाटपाचा संवाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On MNS Shivsena Shinde Group Yuti: मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Embed widget