एक्स्प्लोर

डॉ. झाकीर नाईकांची भाषणं आक्षेपार्ह, आयबीचा दीड वर्षांपूर्वीच अहवाल

मुंबई : डॉ. झाकीर नाईकांच्या आक्षेपार्ह भाषणांसंदर्भात आयबीनं गृह मंत्रालयाला दीड वर्षाआधीच माहिती दिली होती. एवढंच नाही तर 2007च्या ग्लासगो हल्ल्यातील आरोपी सबील अहमद हा जाकीर नाईकांच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता. असं स्पष्ट नमूद केलं होतं. पण दीड वर्षांनंतरही गृह मंत्रालयानं झाकीर नाईकवर कुठलीही कारवाई केली नाही.   बांगलादेश हल्ल्यानंतर सरकारला जाग, पीस टीव्हीवर बंदी   आता बांगलादेश हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे. झाकीर नाईक ज्या पीस टीव्हीवरुन चिथावणीखोर भाषणं देतात, त्याचं प्रसारण करणाऱ्या केबल टीव्ही ऑपरेटर्सवर कडक कारवाई करा, असे आदेश माहिती आणि प्रसारण खात्यानं दिले आहेत.   मुख्यमंत्र्यांकडून झाकीर नाईकांच्या चौकशीचे आदेश   माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ही घोषणा केली. देशभरातील केबल ऑपरेटर्स अवैधपणे त्याचं खुलेआम प्रसारण करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाकीर नाईकांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रानं नाईकच्या पीस टीव्हीचा निकाल लावला आहे.   मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरु   मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी झाकीर नाईक प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवादी घटनांशी संबधित केलेल्या तपासादरम्यान झाकीर नाईकांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.   झाकीर यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन पोलिसांच्या रडारवर   झाकीर नाईकांनी आपल्या भाषणादरम्यान हिंदू आणि इतर धर्माच्या देवतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे की नाही, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यासाठी झाकीर यांच्या भाषणाचं ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यात आलं आहे. याशिवाय, झाकीर नाईक यांची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन देखील पोलिसांच्या रडारवर आहे.   मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंध?   2002 आणि 2003 दरम्यान मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान झाकीर नाईक यांचं नाव समोर आलं होतं. मात्र पुराव्याअभावी त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती समोर येते आहे.   झाकीर नाईकना अटक करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी   वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आलेल्या झाकीर नाईक यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीनं जोरदार आंदोलन केलं. यावेळी झाकीर नाईकांना अटक करण्याची, तसंच त्यांच्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. झाकीर फक्त हिंदूच नाही, तर इतर धर्मांच्या देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे. झाकीर नाईकांवर वेळीच कारवाई केली नाही तर देशव्यापी आंदोलन छेडण्याचा ईशाराही हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Embed widget