एक्स्प्लोर
GST लाँचिंगच्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नव्हतं : नितीश कुमार
पाटणा : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या 30 जूनच्या जीएसटी लाँचिंग कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित नव्हते. मात्र या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती नितीश कुमार यांनी स्वतः दिली आहे.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 30 जूनला जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, खासदार आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
एनडीएत होतो, तेव्हापासून जीएसटीला समर्थन : नितीश कुमार
जीएसटीची प्रक्रिया गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. आम्ही जेव्हा एनडीएमध्ये होतो, तेव्हाही जीएसटीच्या समर्थनार्थ होतो. तेव्हा बिहारचे तत्कालीन अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांना अधिकार समितीचे अध्यक्षही बनवण्यात आलं होतं, असंही नितीश कुमार म्हणाले.
जीएसटीमुळे पारदर्शकता येईल : नितीश कुमार
जीएसटी कर प्रणालीमुळे व्यवसाय आणि कर प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर सुरुवातीच्या काळात अडचणी येतील. पण याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जावी, अशी अपेक्षा नितीश कुमार यांनी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement