Tejaswini Reddy Murder Case: वर्षभरापूर्वीच 'ती' हैदराबादहून लंडनला शिकायला गेली; रुममेटने केली चाकू भोसकून हत्या
Indian Student Killed In London: मूळची हैदराबादची तेजस्विनी रेड्डी ही 27 वर्षीय मुलगी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तिथे एका ब्राझिलियन फ्लॅटमेटने तिची हत्या केली.
Indian Student Murder In London: लंडनमधील वेम्बली (Wembly) येथे घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे. हैदराबादहून (Hyderabad) लंडनला उच्च शिक्षणासाठी आलेल्या 27 वर्षीय विद्यार्थिनीची तिच्या ब्राझिलियन रुममेटने वार करून हत्या केली. तेजस्विनी रेड्डी असं मृत मुलीचं नाव आहे. तेजस्विनी गेल्या वर्षी मार्चमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला (London) गेली होती.
दिवसेंदिवस भारतात हत्येचे आणि हत्या करुन त्याही पुढे होत असलेल्या निर्घृण प्रकारच्या घटना वाढत आहेत. यातच आता भारतातून परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलीची तिच्याच रुममेटने हत्या केल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. तेजस्विनीचा चुलत भाऊ विजयने सांगितले की, तेजस्विनी लंडनमधील वेम्बली येथील नील क्रेसेंट परिसरात इतर काही विद्यार्थ्यांसोबत भाड्याच्या घरात राहत होती. सुमारे आठवडाभरापूर्वीच ब्राझिलमधील एक आरोपी तरुण त्यांच्या रुममध्ये शिफ्ट झाला होता.
लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, घटनेची माहिती मिळताच लंडन रुग्णवाहिका सेवेसह पोलीस अधिकारी तेथे उपस्थित झाले. या घटनेमध्ये रुममधील आणखी एका 28 वर्षीय मुलीलाही चाकूचे टोक लागले आणि ती गंभीर जखमी झाली, तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तर, हैद्राबादच्या तेजस्विनी रेड्डी या मुलीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.लंडनमधील नील क्रेसेंट, वेम्बली येथे हा सर्व प्रकार घडला.
प्रकरणी दोघांना अटक
याप्रकरणी घटनास्थळावरून 24 वर्षीय ब्राझिलियन मुलाला (Brazilian Boy) आणि 23 वर्षीय मुलीला अटक करण्यात आल्याचे लंडन पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू असून दुसऱ्या मुलीला पुढे कोणती कारवाई न करता सोडून देण्यात आले आहे. यानंतर याप्रकरणी आणखी एका 23 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टरची प्रतिक्रिया
क्राईम कमांडच्या डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर लिंडा ब्रॅडली म्हणाल्या, या प्रकरणाचा त्वरीत तपास करणे आवश्यक आहे. ब्राझिलियन व्यक्तीबद्दल माहिती दिल्याबद्दल तिने जनतेचे आभार देखील मानले. त्यांनी सांगितलं की आरोपी तरुण सध्या कोठडीत आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील लोक नक्कीच धास्तावले असतील हे मी समजू शकते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. संपूर्ण टीम या खून प्रकरणाच्या तपासात गुंतली असल्यांचही त्या म्हणाल्या.
हेही वाचा:
New Delhi: दारू पिऊन दोन मैत्रिणींमध्ये झाला वाद; एकीने चाकूने वार करून दुसरीचा केला खून