एक्स्प्लोर

हैदराबादेत एकाच व्यक्तीचे 10 हजार कोटी : नायडू

हैदराबाद : हैदराबादमधील एका व्यक्तीने आपल्या खात्यात 10 हजार कोटी रुपये असल्याची माहिती दिल्याचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलं आहे. काळा पैसा योजनेच्या आधारे नायडूंनी हा दावा केला आहे. हैदराबादमध्ये आयडीसी काळा पैसा योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 13 हजार कोटी रुपयांपैकी 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीचे असल्याचा दावा नायडूंनी केला आहे. या दाव्यातून नाव न घेता नायडूंनी एकप्रकारे त्यांच्या राजकीय शत्रूंकडे अंगुलीनिर्देश केल्याचं म्हटलं जातं. काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याची मागणीही चंद्राबाबू नायडूंनी उचलून धरली आहे. 'देशभरातून 65 हजार कोटी रुपयांचं काळ धन जाहीर करण्यात आलं आहे. त्यापैकी 20 टक्के म्हणजे 13 हजार कोटी रुपये एकट्या हैदराबादेत आहेत. त्यातलेही 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीचे आहेत. कायद्यानुसार ही व्यक्ती कोण, हे आम्ही जाणून घेऊ शकत नाही. एखाद्या व्यावसायिकाला इतकी मोठी रक्कम जाहीर करणं शक्य आहे का?' असा सवाल नायडू यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 'नजीकच्या भविष्यात म्हणजे येत्या दोन-तीन किंवा पाच वर्षांत ते काळा पैसा नियमित करुन घेतील. 40 ते 45 टक्के दंड भरायचा आणि ब्लॅक मनी व्हाईट होणार. हे चांगलं नाही का? कोणीच प्रश्न उपस्थित करु शकत नाही.' अशी टिप्पणीही चंद्राबाबूंनी केली. 'भ्रष्टाचारी व्यक्ती काळा पैसाधारकांच्या दृष्टीने राजकारण हा लपण्यासाठी आडोसा झाला आहे. राजकारणातील काही व्यक्ती जनादेशाचा गैरवापर करत आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याची मागणी मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून करणार आहे. त्यामुळे बँक व्यवहारांना चालना मिळेल. तसंच मतं विकत घेण्यालाही चाप बसेल.' असंही नायडू म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Embed widget