(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hybrid Immunity : ओमायक्रॉनवर भारतीयांची हायब्रिड इम्युनिटी प्रभावी ठरेल का?
Hybrid Immunity vs Omicron : भारतामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला. आतापर्यंत तीन रुग्ण आढळल्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. अशातच एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे.
Omicron Variant Third Case in India : ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron) भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. देशात नव्या व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झाले आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून सर्व राज्य सतर्क झाली आहेत. चिंतेच्या वातावरणात सकारात्मक बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात भारतीयांमधील 'हायब्रिड इम्युनिटी' प्रभावी ठरेल, असा दावा सीएसआयआरकडून करण्यात आलाय. पण ही हायब्रिड इम्युनिटी काय आहे? कोरोनाबाधित लोकांचा कसा बचाव करेल? ओमायक्रॉन व्हेरियंटच्या विरोधात हायब्रिड इम्युनिटी प्रभावी ठरेल का?
ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभराची चिंता वाढवली आहे, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक नसल्याचं म्हटले जातेय. या नव्या व्हेरियंटमुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्याही अद्याप समोर आलेली नाही. भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केल्यानंतर CSIR ने म्हटलेय की, ‘कोरोनाच्या विरधात भारतीयांमध्ये हायब्रिड इम्युनिटी मिळाली आहे. ही भारतासाठी सकारात्मक गोष्ट आहे.’
जाणून घ्या हायब्रिड इम्युनिटीबद्दल -
CSIR चे (Council of Scientific & Industrial Research) डायरेक्टर विकास भाटिया यांनी हायब्रिड इम्युनिटीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना संक्रमणावेळी आणि लसीकरण अशा दोन्हीमुळे तयार होणाऱ्या इम्युनिटीला हायब्रिड इम्युनिटी म्हणतात. ज्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यामध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारक शक्ती विकसित होते. यांनी कोरोना प्रतिबंधक लसही घेतली असेल. तर या दोन्हीची मिळून हायब्रिड इम्युनिटी तयार होते. दरम्यान, डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. CSIR मधील तरुण अग्रवाल यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून इतर देशांच्या तुलनेत भारतात नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आढळली आहे. भारतातील लोकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी असल्यामुळे देशातील रुग्णसंख्या घटली आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेत 2/3 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोना लसीकरण वेगानं झालं. त्यामुळे भारतातील लोकांमध्ये हायब्रिड इम्युनिटी तयार झाली आहे.
Hybrid immunity in Covid means a (combined) immunity acquired through both the infection and vaccination. When these two work together it’s called hybrid immunity: Executive Director All India Institute of Medical Sciences, Bibinagar, (near Hyderabad) Prof (Dr) Vikas Bhatia pic.twitter.com/xlGGNZtkeD
— ANI (@ANI) December 4, 2021
संबधित बातम्या :
Omicron in Gujarat : कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव, झिम्बाब्वेमधून आलेल्या नागरिकाला लागण
Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला
Omicron Virus : ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्तांची ग्वाही
Omicron : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live