एक्स्प्लोर

आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स!

आयटी रिटर्न कसं भरायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली, तरी आयटी रिटर्न भरणं किती सोपं आहे हे आपल्याला कळेल. आपण नवा मोबाईल घेतल्यानंतर त्यातील फंक्शन्स कसे ऑपरेट करायचे हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण एकदा त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं समजायला लागतं, तसंच आयटी रिटर्नच्या बाबतीतही लागू आहे.

मुंबईआयटी रिटर्न कसं भरायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली, तरी आयटी रिटर्न भरणं किती सोपं आहे हे आपल्याला कळेल. आपण नवा मोबाईल घेतल्यानंतर त्यातील फंक्शन्स कसे ऑपरेट करायचे हे आपल्याला माहित नसतं. मात्र आपण एकदा त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं समजायला लागतं, तसंच आयटी रिटर्नच्या बाबतीतही लागू आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी टिप्स पगारदारांचं आयटी रिटर्न करदात्यांना आपण कोणता आयटी फॉर्म भरायचा असतो हेच माहित नसतं. जर तुमचं उत्पन्न केवळ पगारातून असेल, तर तुम्ही आयटीआर 1 म्हणजे ‘सहज’ हा फॉर्म भरा. तुम्ही व्यावसायिक किंवा पगाराशिवाय अन्य मार्गातून उत्पन्न मिळत असेल, तर तुम्हाला आयटीआर 3 किंवा 4 हा फॉर्म भरावा लागेल. जर तुम्ही चुकीच्या फॉर्मवरुन आयटी रिटर्न फाईल केलं, तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. त्यावेळी तुम्हाला मुदतीत नवं रिटर्न फाईल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असतील. जर तुम्ही मुदतीत रिवाइज्ड आयटीआर भरु शकला नाहीत, तर तुम्ही रिटर्न फाईल केलं असं मानलं जाणार नाही. रिटर्न भरताना कोणती कागदपत्रं आवश्यक? तुमच्या उत्पन्नानुसार कागदपत्रांची आवश्यकता असेल. तुम्ही नोकरदार असाल तर कंपनीने दिलेला फॉर्म 16 सर्वात महत्त्वाचा आहे. याशिवाय जर तुमचं बचतं खातं/सेव्हिंग अकाऊंट असेल किंवा मुदत ठेव/ फिक्स्ड डिपॉझिट असेल, त्यावर मिळणाऱ्या व्याजाचं सर्टिफिकेट (बँकेत मिळतं), टीडीएस सर्टिफिकेट, तुमच्या पगारातून जे जे कपात होतं, त्याचे पुरावे, जर गृहकर्ज असेल तर त्याचं सर्टिफिकेट (बँकेत मिळतं), किंवा महत्त्वाची सर्टिफेकट ऑनलाईन उपलब्ध आहेत. जर तुम्ही गेल्या आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर जुनी कंपनी आणि नवी कंपनी अशा दोन्ही कंपन्याचे फॉर्म 16 आवश्यक आहेत. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुमच्या प्रत्येक खात्याचे डिटेल्स द्या. याशिवाय यंदा रिटर्न फाईल करताना तुम्हाला नोटबंदीच्या काळात तुम्ही किती रुपये अकाऊंटमध्ये भरले याचेही डिटेल्स द्यावे लागणार आहेत.  फॉर्म 16 तुम्हाला नोकरीतून मिळत असलेल्या उत्पन्नाचा अधिकृत दाखला म्हणजे फॉर्म 16 होय. हा फॉर्म तुमची कंपनी देते. कंपनीकडून तुमच्या पगारातून टीडीएस कापला जातो. फॉर्म 16 कंपनी देत असली, तरी कंपनी तो तयार करत नाही, तो आयकर विभागाच्या ट्रेसेस https://www.tdscpc.gov.in/app/login.xhtml या अधिकृत सॉफ्टवेअरवर करावा लागतो.  आयटी रिटर्न कसा भरावा? (आयटीआर 1 साठी ) 1) आयकर विभागाच्या वेबसाईटला क्लिक करा http://incometaxindiaefiling.gov.in/  या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं लॉग इन बनवून रजिस्ट्रेशन करावं लागेल. तुमचा पॅन नंबर हा तुमचा युझर आयडी असेल. पासवर्ड तुम्हाला जनरेट करता येतो. तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल, त्यावरुन पासवर्ड जनरेट करा. Income Tax file-compressed 2) लॉग इन केल्यानंतर तुम्हाला – ई फाईल टॅबमध्ये Prepare & Submit Online Form दिसेल इथे क्लिक करा. 3) यानंतर तुम्हाला पत्ता विचारणारा पर्याय येईल. त्यापैकी पॅन डेटा निवडल्यास तुमचं प्रोफाईल आपोआप अपडेट येईल. याशिवाय गेल्यावर्षी भरलेला तपशील निवडल्यासही प्रोफाईल आपोआप अपडेट होईल. *जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल, तर तो टाईप करावा लागेल. आधीच्या दोन पर्यायात पत्ता लिहिण्याची गरज नाही. *यानंतर पुढील पानावर तुम्हाला उत्पन्नाचा तपशील भरायचा आहे. फॉर्म 16 वरील तपशील इथे भरावा लागेल. फॉर्म 16 मधील पार्ट B मध्ये असलेला करपात्र उत्पनाचा तपशील भरायचा आहे. जसे – GROSSTOTALINCOME 4) यानंतर Sections 80C हा पर्याय आहे. त्यामध्ये फॉर्म 16 मध्ये Sections 80C मध्ये केलेली एकूण गुंतवणूक एकरकमी लिहा. करसवलतीचे अनेक पर्याय आहेत, त्यातील गुंतवणूक वेगवेगळी न लिहिता एकत्रच लिहा. जर तुम्ही NPS अर्थात नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल, तर ती 80CCD मध्ये भरा. ((C) Section 80CCD:National Pension Scheme) NPS साठी 50 हजार अतिरिक्त करसवलत आहे. 5) यानंतर तुम्ही भरलेल्या कराचा तपशील दिसेल. जो तुमच्या फॉर्म 16 Part A मध्ये असतो. ती आणि इन्कम टॅक्स रिटर्नवरील एकूण रक्कम समान असते. जर ती रक्कम समान येत नसेल, तर तुमचे आकडे भरणे चुकलं असल्याची शक्यता आहे. तुमचा फॉर्म 16 जनरेट झाल्यानंतर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल, तर ती माहिती इथे भरा. तुम्हाला रिफंड मिळेल. 6) यानंतर तुमच्या सर्व बँक खात्यांचा तपशील द्या. तुमचा अकाऊंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर बँक तपशील आपोआप येईल. 7) याशिवाय नोटांबंदीच्या काळात कोणत्या खात्यात किती रुपये भरले याचाही तपशील द्यावा लागेल. जर तुम्ही या काळात काही रक्कम भरली नसेल तो रकाना रिकामा सोडा. 8) यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल तो बरोबर आहे का तपासून सबमिट करा. त्यानंतर भरलेला रिटर्न व्हॅलिडेट करा. यामध्ये तीन पर्याय असतील. 1) प्रिंट काढून सही करुन बंगळुरुला पाठवणे. 2) डिजिटल सिग्नेचर 3 ) आधार ओटीपी यापैकी आधार ओटीपी हा सोईचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर आधार ओटीपी नंबर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर येईल. तो सबमिट करा. 9) तुमचा टॅक्स रिटर्न इन्कम टॅक्स विभागाकडे फाईल झाला असेल. अधिक माहितीसाठी करसल्लागारांशी संपर्क साधा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget