एक्स्प्लोर
हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती
हनीप्रीत ही इटहरीमध्ये लपल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर प्रीतम सिंहनं तिला बिराटनगरमध्ये आपल्या घरी पाठवलं.
![हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती Honeypreet In Nepals Biratnagar Source Latest Update हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19110610/honeypreet1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
काठमांडू (नेपाळ) : बाबा राम रहीमच्या सर्वात जवळची व्यक्ती समजली जाणारी हनीप्रीत ही गेल्या अनेक दिवसांपासून फरार असून पोलीस सध्या तिचा कसून शोध घेत आहेत. पण हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपल्याची माहिती आता समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीत ही बिराटनगरमधील डेरा प्रेमी प्रीतम सिंह याच्या घरी लपली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनीप्रीत ही इटहरीमध्ये लपल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर प्रीतम सिंहनं तिला बिराटनगरमध्ये आपल्या घरी पाठवलं. बिराटनगर हे नेपाळमधील सर्वात मोठं शहर आहे. जे इटहरी हायवेपासून 26 किमी दूर आहे.
दरम्यान, काल (सोमवार) सिरसा पोलिसांनी डेरा सच्चाची अध्यक्ष विपासना इन्सा हिची देखील चौकशी केली. तब्बल साडेतीन तास ही चौकशी सुरु होती. यावेळी तिने एक मोठी माहिती पोलिसांना दिली आहे. विपासनाच्या मते, राम रहीम जेलमध्ये गेल्यानंतर हनीप्रीत ही सिरसामधील डेऱ्याच्या मुख्यालयात आली होती.
हरियाणा पोलिसांनी पंचकुलामध्ये हिंसा भडकवणाऱ्या 43 आरोपींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये हनीप्रीतचं नाव सगळ्यात वर आहे. तसेच या यादीत डेराचा प्रवक्ता आदित्य इन्साचं देखील नाव आहे.
संबंधित बातम्या :
पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र
हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी
हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)