Holidays In 2023: पुढील वर्षी तुमच्या सुट्टीच्याच दिवशी येत आहेत 'हे' सण, पाहा संपूर्ण यादी
New Year 2023: नवीन वर्ष 2023 सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या वर्षी वीकेंडला किती सण येत आहेत आणि किती सुट्ट्या वाया जाणार आहेत, ते पाहूया.
New Year 2023: नवीन वर्ष 2023 सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष येताच लोक सर्वात आधी कॅलेंडरकडे मोठ्या उत्सुकतेने पाहतात आणि कोणता सण कोणत्या दिवशी येत (Holidays In 2023) आहे, हे शोधतात. यानुसार लोक त्यांचे नियोजन करतात. तसेच लग्नापासून ते आउटिंग आणि मुलांच्या परीक्षांपर्यंत संपूर्ण डेटा गोळा करतात. जेणेकरून त्यांना त्यांचे पुढील सुट्टीचे (Holidays In 2023) प्लान्स बनवता येतील. दरवर्षी असे घडते की, अनेक सण आठवड्याच्या शेवटी येतात आणि या सुट्ट्या वाया जातात. या वर्षी वीकेंडला किती सण येत आहेत आणि किती सुट्ट्या वाया जाणार आहेत, ते पाहूया.
Holidays In 2023 : 14 जानेवारी 2023, मकर संक्रांती (Makar Sankranti 2023 Date), पोंगल - शनिवार
यावेळी मकर संक्रांती (Makar Sankranti 2023 Date) आणि पोंगल हे दोन्ही सण 14 जानेवारीला शनिवारी येत आहेत. यामुळे एक सुट्टी कमी झाली. ज्या ठिकाणी पाच दिवसांचा आठवडा असतो, तेथे शनिवारही सुट्टी असते. अशा परिस्थितीत वर्षाच्या पहिल्या महिन्यातच या लोकांची एक सुट्टी वाया जाणार आहे.
Holidays In 2023 : 18 फेब्रुवारी 2023, महाशिवरात्री, शनिवार
2023 मध्ये महाशिवरात्रीचा सण (Makar Sankranti 2023 Date) शनिवारी येत आहे. अशा प्रकारे वीकेंडला असल्याने या सणाची सुट्टी वेगळी मिळणार नाही. मात्र ज्यांना फक्त रविवारची सुट्टी मिळते, त्यांना याचा फायदा होणार आहे. अशा लोकांना शनिवार आणि रविवार दोन्ही सुट्टी मिळेल.
Holidays In 2023 : 22 एप्रिल 2023, ईद-उल-फित्र, शनिवार
नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार ईद 22 एप्रिलला आहे. या दिवशीही शनिवार असल्याने ज्या लोकांना पाच दिवसांचा आठवडा, त्याची ती सुट्टी वाया जाणार आहे.
Holidays In 2023 : 12 नोव्हेंबर 2023, दिवाळी, रविवार
यंदाच्या मोठ्या सणांपैकी एक असलेला दिवाळी (Diwali 2023 Date) यंदाही रविवारी येत आहे. यंदा दीपावली रविवार, 12 नोव्हेंबर रोजी येत असून दिवाळीच्या तीन-चार दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये एक सुट्टी कमी असेल.
Holidays In 2023 : 19 नोव्हेंबर 2023, छठ पूजा, रविवार
उत्तर भारतीयांसाठी मोठा सण असलेला छठपूजाही यंदा रविवारी आहे. अशा प्रकारे आणखी एक मोठी सुट्टी वाया जाईल. ही संपूर्ण यादी बघता असे म्हणता येईल की, यंदा अनेक सुट्ट्या कमी होणार असून सुट्ट्यांच्या दृष्टीने हे वर्ष चांगले नाही.
Holidays In 2023 : पुढील वर्षी दहीहंडी (Dahi Handi 2023) आणि अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi 2023) दिवशी सुट्टी असणार
दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे 2023 साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार पुढील वर्षी सात सप्टेंबरला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी, तर 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दोन्ही दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा शासकीय निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.