एक्स्प्लोर

Uncle-Nephew Battle In Politics: महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही गाजला आहे काका-पुतण्याचा वाद; कोणाची सरशी आणि कोणाचा पराभव?

Uncle-nephew battle in Politics: फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातही काका-पुतण्याचा वाद गाजला आहे.

Maharashtra Politics:  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा वाद निर्माण झाला आहे. राज्यात काका-पुतण्या वादाची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. काका-पुतण्या वाद हा महाराष्ट्रात गाजणारा वाद नसून देशाच्या राजकारणातही काका-पुतण्याचा वाद गाजला असल्याचे दिसून येते. देशाच्या राजकीय क्षेत्रात काका-पुतणे वेळोवेळी एकमेकांशी भांडले आणि वेगळे होऊन दुसऱ्या पक्षात गेले. कधी पुतण्या पक्षातील महत्त्वाच्या पदासाठी योग्य नसल्याची काकांची तक्रार होती. तर कधी पुतण्याने काकांबद्दल तक्रार केली.

अलीकडच्या काही राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर लक्षात येईल की राजकारणात सर्वात मोठा धोका जवळच्या नातेवाईकांकडूनच येतो. विशेषतः राजकारणात पक्षाच्या निवडणूक चिन्हावर प्रत्येकाचा दावा असतो. 

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेल्या संघर्ष हा राजकारणासाठी नवा नसून इतिहासाची पुनरावृत्ती आहे. या आधी कोणत्या काका-पुतण्यात वाद गाजला, यावर एक नजर...

>> शिवपाल यादव-अखिलेश यादव

राजकारणातील काका-पुतण्याच्या लढतीत शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यातील लढतीची जोरदार चर्चा रंगली होती. सध्या दोघेही एकत्र आहेत. समाजवादी पक्षाशी संबंधित काका-पुतणे दोघांनाही पक्ष आपलाच वाटत होता. एकीकडे अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी पक्षाचा पाया घातला, तर दुसरीकडे काका शिवपाल यांनी पक्षाला वाढवण्यासाठी मेहनत घेतली. पुतणे अखिलेश यांनी पक्षात पाऊल ठेवल्याने पक्षात काही काळानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसून आले नाही.

उत्तर प्रदेशच्या 2012 च्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाने बहुमत मिळवले आणि त्याऐवजी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. मुलायम सिंह यांचा उत्तराधिकारी म्हणून स्वत:कडे पाहणारे काका शिवपाल यांना धक्काच बसला. त्यानंतर काका-पुतण्या दोघांमध्ये वाद सुरू झाला.

2017 मध्ये, उत्तर प्रदेशच्य सत्तेतून समाजवादी पक्ष पायउतार झाला आणि काका-पुतण्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर 2018 मध्ये शिवपाल यांनी बंड केले. शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पार्टी नावाचा वेगळा पक्ष काढला. सपापासून वेगळे झालेले शिवपाल राजकारणात विशेष ओळख निर्माण करू शकले नाहीत आणि अखेर ते सपामध्ये परतले. इथे पुतण्याने काकांवर मात केली.

>> प्रकाशसिंग बादल-मनप्रीतसिंग बादल

पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल आणि मनप्रीत बादल म्हणजेच काका-पुतण्याची जोडी एकेकाळी खूप गाजली होती. 1995 मध्ये मनप्रीत पहिल्यांदा आमदार झाले. 2007 मध्ये प्रकाश सिंह पंजाबच्या बादल सरकारमध्ये अर्थमंत्रीही झाले, पण हळूहळू बादल कुटुंबातही भांडणे सुरू झाली.

पक्षांतर्गत प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल यांना अधिक पसंती देण्यात आली आणि मनप्रीत यांना दूर ठेवण्यात आले. यानंतर मनप्रीतनेही काही मुद्द्यांवर पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम असा झाला की 2010 मध्ये त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचे आरोप झाले आणि ते पक्षापासून वेगळे झाले. 

मनप्रीत सिंग बादल यांनी 2011 मध्ये पीपल्स पार्टी ऑफ पंजाब नावाचा नवा पक्ष स्थापन केला. 2012 च्या पंजाब निवडणुकीत दोन जागा लढवल्या, पण दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2016 मध्ये मनप्रीतच्या पक्षाने काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले.  जानेवारी 2023 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. मनप्रीत बादल सध्या भाजपमध्ये आहेत.

>> पशुपती नाथ पारस-चिराग पासवान

पशुपती नाथ पारस-चिराग पासवान हे बिहारमधील काका-पुतण्यांमधील हायप्रोफाइल संघर्षाचे उदाहरण आहे. रामविलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले. यानंतर त्यांचा पक्ष लोक जनशक्ती पक्ष फुटला. येथेही पक्षाचा वारसदार होण्याची राजकीय लढाई सुरू झाली. परिणामी पक्षाचे दोन तुकडे झाले. लोक जनशक्ती पक्षाचे नेतृत्व चिराग पासवान यांच्याकडे होते आणि पशुपतीनाथ पारस यांनी राष्ट्रीय लोजपाची धुरा हाती घेतली होती. पशुपतीनाथ पारस यांना पक्षाच्या बहुसंख्य खासदार, आमदारांनी साथ दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाने पशुपतीनाथ पारस यांच्याकडे मूळ पक्ष दिला. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी चिराग पासवान स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणत होते.  पण भाजपने चिरागला झटका दिला आणि काका पशुपती पारस यांना मोदी सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

>> रक्ताचे नाते नाही, पण नितीश आणि तेजस्वीची जोडी प्रसिद्ध

काका-पुतण्याची आणखी एक प्रसिद्ध जोडी म्हणजे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव. दोघांमध्ये रक्ताचे नातेसंबंध नसले तरी काका-पुतण्या ही जोडी बिहारमध्ये प्रसिद्ध आहे. नितीश हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. सध्या दोघांच्या नात्यात गोडवा पाहायला मिळत असला तरी त्यांच्या नात्यात चढउतार दिसून आला आहे. 

हे दोघे एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते आणि आजही ते जवळचे मित्र आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव नितीश कुमार यांना काका म्हणून संबोधतात. 

>> दुष्यंत-अभय चौटाला यांचा संघर्ष

2021 मध्ये हरियाणात इंडियन नॅशनल लोकदलाचे नेतृत्व करणाऱ्या चौटाला कुटुंबाचा संघर्ष रस्त्यावर आला होता. काका अभय चौटाला यांनी इंडियन नॅशनल लोकदलावर आपला हक्क सांगितला आणि पुतण्यांनीही बंड केले. दुष्यंत चौटाला आणि दिग्विजय चौटाला या दोन्ही पुतण्यांनी ‘जननायक जनता पार्टी’ हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. इकडे पुतण्यांनी काकांवर मात केली.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पक्ष किंग मेकर म्हणून उदयास आला. दुष्यंत चौटाला आज हरियाणाचे उपमुख्यमंत्री आहेत. तर, काका अभय चौटाला हे विधानसभेचे सदस्य देखील नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget