फेअर अँड लव्हलीतून 'फेअर' हटवलं; 'हे' आहे नवीन नाव
फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची.
नवी दिल्ली : फेअर अँड लव्हली (Fair & Lovely) या फेअरनेस क्रीममधून अखेर फेअर हा हटवण्यात आला आहे आहे. फेअर अँड लव्हलीचं नाव आता 'ग्लो अँड लव्हली' (Glow & Lovely) असणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने रिब्रँडिंग करत हा निर्णय घेतला आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला फेअर अँड लव्हली याना नावामुळे अनेक वर्णभेदाच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे. अनेकांना या नावावर आक्षेप घेतला होता. फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दातून फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणाशी संबंधित मर्यादित अर्थ साधला जायचा. त्यामुळे वेळोवेळी हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडवर टिकाही व्हायची. त्यानंतर अखेर कंपनी आपल्या क्रीमच्या नावातून फेअर शब्द हटवलं आहे.
- फेअर अँड लव्हलीतून 'फेअर' गायब होणार?
- BLOG | बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं सौदंर्य हरवतयं का? #Racism
पुढीच्या काही महिन्यात ग्लो अँड लव्हली मार्केटमधून ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. तसेच कंपनीकडून भविष्यात इतरही काही बदल यामध्ये होण्याची शक्यता आहे. फेअर अँड लव्हलीसह कंपनी पुरुषासाठी असलेल्या फेअर अँड हँडसम (Fair & Handsome) क्रीमचं नावही बदललं आहे. या क्रीमचं नाव आता ग्लो अँड हँडसम (Glow & Handsome) असणार आहे.
फेअर अँड लव्हलीवर आधीपासून टीक व्हायचीच. मात्र दरम्यानच्या काळात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर वर्णभेदाचा वाद निर्माण झाला होता. ब्लॅक लाईव्हज् मुव्हमेंट सुरू झाली. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या स्किन व्हाइटनिंग उत्पादनांची विक्री थांबवली. भारतातही त्याचे परिणाम दिसू लागल्याने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाईन याचिका दाखल झाल्या. या मोहिमेला अनेकांनी पाठिंबा दर्शवला. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरने हे महत्त्वाचं पाऊल उचललं.
EXPLAINER VIDEO | Fair and Lovely | सौंदर्याची संकल्पना गोरेपणाशिवाय अधुरी?