एक्स्प्लोर

खासदारांचे लवकरच अच्छे दिन, दुप्पट वेतन वाढीची शिफारस

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील आमदारांनंतर आता देशभरातील खासदारांनाही अच्छे दिन येणार आहेत. खासदारांचं वेतन 50 हजारांहून एक लाख रुपये म्हणजेच दुप्पट करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओकडे देण्यात आला आहे. त्यामुळे या शिफारशींवर आता पीएमओ अंतिम निर्णय घेणार आहे.   नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये यासंबंधी विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे. भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने मागील वर्षी वेतन, भत्ते आणि माजी खासदारांचं पेंशन दुप्पट करण्याचा प्रस्ताव दिला होता. खासदारांचं वेतन 50 हजारांहून एक लाख करणे आणि भत्त्यात वाढ करण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे.   खासदारांसाठी हिवाळी अधिवेशनानंतर 'अच्छे दिन'?   योगी आदित्यनाथ यांच्या सिमितीने मागील वर्षी सादर केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने त्यावर कामही सुरु केलं होतं. मात्र टिका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव अमान्य केला होता. त्यानंतर हा मुद्दा काही काळासाठी प्रलंबित ठेवण्यात आला. मात्र सरकार या वर्षात हा प्रस्ताव मान्य करण्याच्या तयारीत आहे.   सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मान्य झाल्या असताना खासदारांच्या वेतन वाढीचा प्रस्तान मान्य करण्यासाठी का विलंब केला जात आहे, असा प्रश्न संयुक्त संसदीय बैठकीमध्ये खासदारांकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पीएमओने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर कॅबिनेट त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात वेतन वाढीसाठी विशेष विधेयक पास केलं जाईल.   खासदार निधी पाचपट करण्याची मागणी   याच बैठकीत खासदार विकास निधी 5 कोटींवरुन 25 कोटी म्हणजे पाचपट करण्याची मागणी करण्यात आली. याच महिन्यात भाजपाच्या जवळपास 250 खासदारांनी खासदार निधी पाचपट केला जावा, अशी मागणी मोदींकडे केली होती. मात्र मोदींनी ही मागणी फेटाळली असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget