एक्स्प्लोर
जम्मूमध्ये मुसळधार पावसानं पुराचं थैमान, दोघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर: जम्मूमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे नदी आणि नाल्यांनी रौद्र रूप धारण केलं. नद्यांनी आपलं पात्र सोडलं आहे. पुराचं पाणी अनेक भागात शिरलं आहे. तर जानीपूर भागात पाण्याच्या प्रवाहात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
कार्यालय, पोलिस चौकी, पूल, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. गाडीगड परिसरात पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. शिवाय चौकी समोरच्या कार्यालयांच्या भिंती तोडून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला आहे. मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
जम्मू मधील बऱ्याच नद्या धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं अलर्ट घोषित केलं आहे. यासाठी प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून संबंधित कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement