एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुसळधार पावसानं जोधपुरला झोडपलं
जोधपूर : मुसळधार पावसानं राजस्थानमधील जोधपुरला अक्षरश: झोडपून काढलं आहे. काल अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जवळपास एक तास झालेल्या या पावसात शहर जलमय झालं होतं. तर यावेळी एक डॉक्टर आपल्या दुचाकीसह वाहून गेला.
शनिवारी दुपारी एक तास बरसलेल्या पावसात संपूर्ण शहर जलमय झालं होतं. तर पावसाच्या पाण्यासोबत ऑटो रिक्षा आणि अनेक दुचाकी वाहून गेल्या.
दुसरीकडे गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्येही पावसाचा कहर पाहायला मिळाला. जोरदार पावसामुळे गुजरातमध्ये अनेक शहरं जलमय झाले होते.
तर उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झालेल्या मुसळधार पावसात एक बस अडकली होती. यावेळी बसमधील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जोधपूरमध्ये वातावरणात कमालीचा गारवा असल्यानं लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement