Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या
Covid-19 in India : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
![Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या health ministry issued new guidelines for covid 19 after rise in cases Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/d8fb0b2d2f74cbe3b33a67ffdcb7cf341679274064022322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New Corona Guidelines : देशात एकीकडे H3N2 विषाणूचा (H3N2 Influenza) संसर्ग वाढत असतना दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. कोविडच्या (Covid19) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा वाढता धोका पाहता नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मंत्रालयाने सांगितलं आहे की, पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरियल एन्फेक्शन (Bacterial Infection) म्हणजेच व्हायरल फ्लू झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटीकचा वापर करू नये.
देशात कोरोनाचा विषाणूचा वाढता धोका
देशात गेल्या 24 तासांत हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड रुग्णांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ पाहता आरोग्य मंत्रालयाने रविवारी (19 मार्च) कोरोना उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनासोबत इतर कोणतेही विषाणूजन्य संसर्ग आहे का याची नोंद घ्यावी, असं नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे. सौम्य आजारावर सिस्टीमिक आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स घेऊ नका. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषधं घेतलं जाऊ शकतं पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावं.
देशातील कोरोनाची स्थिती
गेल्या काही महिन्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती मात्र, आता पुन्हा कोविडबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही आठवड्यांत रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 129 दिवसांनंतर, भारतात एका दिवसात कोरोनाच्या एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1071 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 5,915 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
'या' राज्यांना लिहिलं पत्र
याआधी गुरुवारी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांना कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणाचं पालन करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे मंत्रालयाने या राज्यांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)