Coronavirus : H3N2 सोबत कोरोनाची डोकेदुखी, सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजारांच्या पुढे
Coronavirus in India : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे.
H3N2 and Covid19 : देशात एकीकडे H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणू वेगाने पसरतोय, तर दुसरीकडे कोरोना विषाणू (Covid19) पुन्हा डोकं वर काढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.
Coronavirus in India : सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे
देशात H3N2 इन्फ्लूएंझाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशातील अनेक भागात कोविड-19 विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 109 दिवसांनंतर देशात कोविड-19 चे 5000 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी 17 मार्च रोजी एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाच्या 796 प्रकरणांची नोंद झाली आहे.
Coronavirus in India : लसीचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 17 मार्चपर्यंत देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5,026 वर पोहोचली आहे. तसेच पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,30,795 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 16 मार्च रोजी एकूण 98,727 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
Coronavirus in India : 'या' राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू
कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्यानुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.80 टक्के आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4,41,57,685 रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे. कोविड 19 मुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के असल्याची नोंद झाली आहे.
H3N2 Influenza : देशात H3N2 इनफ्लूएंझामुळे दहा जणांचा मृत्यू
देशात सध्या कोरोनासोबतच H3N2 व्हायरल विषाणू संसर्ग वेगाने पसरत आहे. H1N1 फ्लूचा म्युटेंट H3N2 फ्लूमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 व्हायरल विषाणूमुळे महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इनफ्लूएंझाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू कर्नाटकमध्ये झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
चिंताजनक! H3N2 वर औषधं उपलब्ध नाही, काळजी घ्या; आरोग्य मंत्र्यांचं आवाहन