एक्स्प्लोर
आलिशान सुविधांसह 'हमसफर' लवकरच रेल्वेच्या ताफ्यात
नवी दिल्लीः राजधानी, दुरंतो आणि शताब्दी या गाड्यांच्या तिकिट दरात वाढ केल्यानंतर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात पुढील महिन्यापासून 'हमसफर' या ट्रेनचा समावेश होणार आहे. आलिशान सुविधा असणाऱ्या या ट्रेनचं तिकिट इतर एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा 20 टक्क्यांनी महाग असणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये या ट्रेनची घोषणा केली होती. या ट्रेनमध्ये खास दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा असून केवळ तीन एसी कोच असणार आहेत. या ट्रेनची सुरुवात पहिल्यांदा दिल्ली ते गोरखपूर या मार्गावर होण्याची शक्यता आहे.
काय आहेत सुविधा?
रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 'हमसफर' ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठीची विशेष सुविधा देणारी इंटरसिटी ट्रेन आहे. यामध्ये मिळणाऱ्या सुविधा इतर कोणत्याही एसी 3 ट्रेनमध्ये दिल्या जात नाहीत. हमसफर ट्रेनमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग सुविधा, इंटिग्रेटेड डिस्प्ले अशा अत्याधुनिक सुविधा आहेत.
हमसफर दिसण्यासाठी देखील इतर गाड्यांपेक्षा आकर्षक असणार आहे. ज्या मार्गांवर इंटरसिटी गाड्यांची आवश्यकता आहे, त्याच मार्गावर हमसफर चालवण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement