एक्स्प्लोर
सातवीतील विद्यार्थ्याची शिक्षिकेला बलात्काराची धमकी
शिक्षिकेने शाळेत यायला सुरुवात केली, मात्र भेदरलेल्या विद्यार्थिनीने अद्याप शाळेत पाऊल ठेवण्याची हिंमत दाखवलेली नाही.

प्रातिनिधीक फोटो
गुरुग्राम : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन पोस्टवर कमेंट करुन या विद्यार्थ्याने शिक्षिका आणि तिच्या मुलीला धमकी दिली. गुरुग्राममधील एका प्रसिद्ध शाळेत ही घटना घडली. संबंधित शिक्षिकेची मुलगी त्याच शाळेत शिकते. बलात्काराची धमकी देणारा विद्यार्थी आणि शिक्षिकेची मुलगी एकाच वर्गात शिकतात. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला. त्यानंतर शिक्षिकेने शाळेत यायला सुरुवात केली, मात्र भेदरलेल्या विद्यार्थिनीने अद्याप शाळेत पाऊल ठेवण्याची हिंमत दाखवलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे याच शाळेत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला कँडल लाईट डिनरवर येण्याची आणि त्यानंतर सेक्स करण्याची गळ घातली आहे. शिक्षिकेला ईमेल पाठवून त्याने ही मागणी केली आहे. सातवी-आठवीतील विद्यार्थ्यांच्या धक्कादायक लैंगिक प्रवृत्तींमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे, मात्र त्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























