एक्स्प्लोर

राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार!

डेरा सच्चा सौदाचा नवा प्रमुख निवडण्यासाठी झालेल्या बैठकीबाबत अतिशय गुप्तचा बाळगण्यात आली होती.

चंदीगड : डेरा सच्चा सौदाच्या एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोष ठरवलेल्या बाबा राम रहीमच्या गुरुसरमोडिया या मूळगावी कुटुंबाची बुधवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत गुरमीत राम रहीमचा मुलगा जसमीत इंसा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असेल यावर सहमती झाली. राम रहीमची आई नसीब कौर यांनी बैठकीनंतर याची माहिती दिली. डेराचे अनुयायी जसमीतला अध्यात्म गुरु मानणार नाही, पण डेरा सच्चा सौदाचं व्यवस्थापन आणि सर्व कार्य सांभाळेल, असंही त्या म्हणाल्या. बैठकीबाबत गोपनीयता डेरा सच्चा सौदाचा नवा प्रमुख निवडण्यासाठी झालेल्या बैठकीबाबत अतिशय गुप्तचा बाळगण्यात आली होती. या बैठकीत राम रहीमची आई नसीब कौर, पत्नी हरजीत कौर आणि मुलगा जसमीत इंसा हेच सहभागी झाले होते. दोन्ही मुली आणि दत्तक मुलगी हनीप्रीतही बैठकीला उपस्थित नव्हत्या. बैठकीनंतर कुटुंबाने रोहतक जेलमध्ये कैद असलेल्या राम रहीमला भेटण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांकडे वेळ मागितला आहे. डेरा प्रमुखाने शिक्कामोर्तब केल्यानंतर नव्या प्रमुखाच्या नावा घोषणा केली जाईल. 1151 कोटींची 1093 एकर जमीन हरियाणाच्या 18 जिल्ह्यांमध्ये डेरा सच्चा सौदाची 1093 एकर जमीन असून त्याची किंमत अंदाजे 1151 कोटी रुपये आहे. सरकारी दराच्या आधारावर ह्या किंमतीचा अंदाज बांधला आहे. डेराच्या जमिनीवर बनलेल्या आश्रमांच्या किंमतीचा अनुमान अद्याप लावलेला नाही. ram-rahim-son-jasmeet_1 डेराच्या संपत्तीमधून हिंसाचाराची नुकसान भरपाई पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं 20 वर्षांची शिक्षा ठोठावली. दोषी ठरवल्यानंतर बाबा रहीमच्या अनुयायींनी हरियाणात अक्षरश: धुडगूस घातला होता. या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचा अंदाजही लावला आहे. यात सैन्य, निमलष्करी दर, रस्ते आणि रेल्वेला झालेलं नुकसानही जोडलं आहे. अशाप्रकारे सुमारे 204 कोटींचं नुकसान झालं आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या निर्देशानुसार सरकार आता बाबा राम रहीमच्या संपत्तीतून नुकसान भरपाई वसूल करेल. 23 व्या वर्षी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देतात. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. Gurmeet-Ram-Rahim-Singh काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्त 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 : बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम दोषी असल्याचा निकाल पंचकुला सीबीआय कोर्टाने दिला 28 ऑगस्ट 2017 : दोन साध्वींवर बलात्कारप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा

संबंधित बातम्या :

तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय? VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट 10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा! हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग! 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय? Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा? न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार! राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget