एक्स्प्लोर
पम्पोरमध्ये शासकीय इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी
पम्पोर (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरमध्ये पम्पोर येथे एका शासकीय इमारतीत दहशतवादी लपल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीमधून सकाळापासून गोळ्यांचे आवाज येत असून धुराचे लोटही बाहेर येत आहे. या हल्ल्यात एक लष्कराचा जवान जखमी झाला आहे. सध्या तिथं सर्च ऑपरेशन सुरु आहे.
ही तीच इमारत आहे जिथे जानेवारी महिन्यात दोन मोठ्या चकमकीत लष्कराचे तीन कमांडो शहीद झाले होते. त्या चकमकीत तीन दहशतवाद्यांनी देखील कंठस्नान घातलं होतं.
ईडीआयच्या (ENTERPRENURESHIP DEVELOPMENT INSTITUTE) इमारतीत दोन ते तीन अतिरेकी घुसले असल्याची शक्यता आहे. सकाळी 6.30 वा. गोळ्यांचे आवाज या इमारतीतून ऐकू आले. त्यानंतर इमारतीतून धुरांचे लोट पाहायला मिळाले. हा संपूर्ण परिसर लष्करानं ताब्यात घेतला असून इथं सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.
फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यानंतर अतिरेकी ईडीआयच्या इमारतीत घुसण्यात यशस्वी झाले होते. या गोळीबारात एका नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement