एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पोलिसांनी परवानगी नाकारुनही हार्दिक पटेलचा अहमदाबादेत भव्य रोड शो

पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव अहमदाबादेत रोड शो काढण्यासाठी परवानगी नाकारली आहे.

अहमदाबाद : पोलीस आणि प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही पाटीदार नेता हार्दिक पटेलने अहमदाबादेत भव्य रॅली काढली. दोन हजार दुचाकींचा या रॅलीत समावेश होता. हार्दिक पटेल निकोल येथेही जाणार आहे, जिथे पाटीदार आंदोलनादरम्यान मोठी हिंसा झाली होती. पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव अहमदाबादेत रोड शो काढण्यासाठी परवानगी नाकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोलाही पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र हार्दिक पटेलने सर्व नियम धाब्यावर बसवून रॅली काढली. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या अलर्टमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे. गुप्तचर यंत्रणांकडून गुजरात पोलिसांना दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधींसह बड्या राजकीय नेत्यांना देखील रोड शोला परवानगी न देण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. आयबीच्या सुत्रांच्या मते, अहमदाबादमध्ये 'लोन वोल्फ अटॅक' होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली आहे. 'लोन वोल्फ अटॅक' म्हणजे काय? 'लोन वोल्फ अटॅक' हा कुणा एका दहशतावाद्याकडून केला जातो. यासाठी दहशतवादी गर्दीच्या ठिकाणांचा वापर करुन आपल्या टार्गेटवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वाहनाचा वापर किंवा अफवा पसरवून देखील हल्ला केला जाऊ शकतो. नुकतंच स्पेनच्या बार्सिलोनामध्ये एक लोन वोल्फ अटॅक करण्यात आला होता. यामध्ये रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना ट्रकनं चिरडण्यात आलं होतं. 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान दरम्यान, गुजरातमधील पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानही 14 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी 68 टक्के मतदान झालं. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार प्रचार सुरु केला आहे. या प्रचारालाही अवघे काही तास बाक असताना अशाप्रकारे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीनं गुजरात पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. संबंधित बातम्या : सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांवर काँग्रेसची तात्काळ कारवाई मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार? मी नरेंद्रभाईसारखा नाही, माणूस आहे, चुकतो : राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार? ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget