दिल्लीतील स्टिंग व्हिडीओ गुजरात निवडणुकीत 'AAP'ला भोवणार? C-Voter Survey मधून धक्कादायक खुलासा
Gujarat Election ABP C-Voter Survey: सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी साप्ताहिक सर्वेक्षण केलं आहे. दिल्लीत स्टिंग व्हिडीओ समोर आल्यामुळे गुजरातमध्ये आपचं नुकसान होणार का?
Gujarat Election ABP C-Voter Survey: गुजरात निवडणुकीचा (Gujarat Legislative Assembly Election 2022) प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून (BJP) दिल्लीत आपच्या (Aam Admi Party) विरोधात एकापाठोपाठ एक असे अनेक स्टिंग व्हिडीओ जारी करण्यात आले आहेत. यामध्ये आप नेत्यांवर निवडणुकीत तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या आपच्या स्टिंग व्हिडीओंमुळे गुजरातमध्ये 'आप'ला नुकसान पोहोचणार का? हे जाणून घेण्यासाठी सी-व्होटरनं (C-Voter Survey) एबीपी न्यूजसाठी (ABP News) साप्ताहिक सर्वेक्षण केलं आहे.
आजचे साप्ताहिक सर्वेक्षण हे शेवटचं साप्ताहिक सर्वेक्षण आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्रातील 54 आणि दक्षिण गुजरातमधील 35 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सी-व्होटरनं केलेल्या या सर्वेक्षणात 1 हजार 889 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
दिल्लीत व्हायरल झालेल्या स्टिंग व्हिडीओंमुळे गुजरातमध्ये AAP ला नुकसान होणार?
सी-व्होटर सर्व्हेमध्ये दिल्लीतील 'आप'विरोधातील स्टिंग खुलाशामुळे गुजरातमध्ये 'आप'चे नुकसान होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेक्षणातून या प्रश्नाचा धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणात 51 टक्के लोकांनी दिल्लीतील 'आप' विरोधात केलेल्या स्टिंग खुलाशामुळे गुजरातमध्ये पक्षाचे नुकसान होईल, असं म्हटलं आहे. तर 45 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, दिल्लीतील स्टिंग व्हिडीओंमुळे गुजरातमध्ये आपचं नुकसान होणार नाही. दुसरीकडे, गुजरातमध्ये या स्टिंग व्हिडीओंचा काहीही परिणाम होणार नसल्याचंही 4 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
दिल्लीमध्ये समोर आलेल्या स्टिंग व्हिडीओंमुळं गुजरातमध्ये AAPला नुकसान होणार?
स्रोत : सी-व्होटर
हो : 51 टक्के
नाही : 45 टक्के
काहीच फरक पडणार नाही : 4 टक्के
टीप: सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. यासाठी एबीपी न्यूज जबाबदार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
गुजरातमध्ये भाजप, काँग्रेससमोर 'आप'चं आव्हान; सर्व जागांवर लढवणार निवडणूक, जनतेचा कल कोणाकडे?