एक्स्प्लोर

Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ फुललं; काँग्रेसचा दारुण पराभव

Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही तास उरले आहे. यंदा कोण गुजरातचं मैदान राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Key Events
Gujarat Assembly Election Result 2022 Live updates Gujarat elections results of Gujarat Assembly Election votes counting today 8 december Winners Name Live Counting News Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ फुललं; काँग्रेसचा दारुण पराभव
Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates

Background

Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभेचं (Gujarat Assembly Election) मैदान कोण मारणार हे येत्या काही तासातच समजणार आहे. त्यावरच दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभेचा (Lok Sabha Elections) ट्रेंडही सेट होणार आहे. मोदी-शाहांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत भाजपशी (BJP) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टीची (Aam Aadmi Party) थेट लढत झाली आहे. त्यामुळे विजय कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता वाढली आहे. 

गुजरातमध्ये भाजपची 27 वर्षापासून सत्ता आहे. त्यातली 12 वर्ष स्वत: मोदीच (PM Narendra Modi) गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) होते. मात्र कोविडमध्ये (Covid-19) लोकांचे झालेले हाल, महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) या मुदद्यांमुळे ही इलेक्शन (Election) गाजली. मोदी (PM Modi) आणि शहांनी (Amit Shah) मिळून पन्नासहून अधिक सभा आणि रॅली केल्या. तरीही मतदारांचा उत्साह वाढला नाही.

गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या ((Gujarat Assembly Election LIVE) 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपनं भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्यानं कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे. 

गेल्या 27 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujarat Assembly Election Results LIVE) संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निकालासाठी काही तास उरले आहेत त्यामुळे उमेदवारांची आणि भाजप, आप आणि काँग्रेस पक्षाची धाकधुक वाढली आहे. 

गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि या दोन्ही टप्प्यांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलंय. तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आता भाजप गुजरातमध्ये गड राखणार की आप आणि काँग्रेस भाजपचा गड भेदणार हे उद्याच कळेल. एबीपी माझावर  तुम्ही उद्या सकाळपासून या निकालाचं सुपरफास्ट कव्हरेज पाहु शकणार आहात. 

13:56 PM (IST)  •  08 Dec 2022

Gujarat Election: गुजरात निवडणुकीत भाजपच्या यशानंतर बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

Gujarat Election: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.

13:24 PM (IST)  •  08 Dec 2022

Gujarat Election 2022: आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या इशुदान गढवींचा पराभव

Gujarat Election 2022: आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या इशुदान गढवींचा पराभव, भाजपचे मुलुभाई बेडा विजयी 
 
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget