एक्स्प्लोर
गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये भाजपला काँग्रेसने तगडं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी दोन दिवस उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये भाजपला काँग्रेसने तगडं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी सर्व चॅनल्सने ओपिनियन पोल अर्थात जनमत चाचणी दाखवली आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती मतं मिळतात आणि किती जागा मिळतात, ते दाखवण्यात आलंय. आम्ही तुम्हाला सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एकाच ठिकाणी दाखवणार आहोत.
एबीपी न्यूज-सीएसडीएसचा ओपिनियन पोल काय सांगतो?
एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसला समान मतं मिळताना दिसत आहे. काँग्रेसला 43 टक्के, तर भाजपलाही 43 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
जागांच्या बाबतीत काँग्रेससाठी आशादायी चित्र आहे. कारण एबीपी न्यूजच्या अंतिम ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला 82, तर भाजपला 95 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाऊचा सर्व्हे
टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर यांच्या सर्व्हेनुसार, भाजप सहजरित्या बहुमताच्या आकडत्यापर्यंत जाताना दिसत आहे. भाजपला 45 टक्के, काँग्रेस 40 टक्के आणि इतरांना 15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेनुसार, भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 111, काँग्रेस 68 आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही 9 चा सर्व्हे काय सांगतो?
टीव्ही 9 च्या सर्व्हेनुसार, भाजपला 47 टक्के, काँग्रेसला 42 टक्के आणि इतरांना 11 टक्के मतं मिळताना दिसत आहे. यानुसार भाजपला 109 आणि काँग्रेसला 73 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सहारा-सीएनएक्सचा सर्व्हे
भाजपला 50 टक्के आणि काँग्रेसला 41 टक्के मतं मिळतील, असं सहारा-सीएनएक्सच्या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. यानुसार, भाजपला 128, तर काँग्रेसला 52 जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.
सरासरी अंदाज काय सांगतो?
सर्व चॅनल्सच्या ओपिनियन पोलमध्ये वेगवेगळा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस सत्तेत येताना तर कुठेही दिसत नाही, मात्र काँग्रेसचं पुनरागमन मात्र होत आहे. सर्व चॅनल्सच्या सरासरीनुसार, भाजपला 111 आणि काँग्रेसला 69, तर इतर पक्षांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement