एक्स्प्लोर
अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल : गिरीश महाजन
अण्णा हजारेंसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल, असा दावा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी रामलीला मैदानावर जात अण्णा हजारेंशी चर्चा केली.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस होता.
अण्णांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. जनलोकपाल आणि शेतमालाला दीडपट भाव यासह अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारे आंदोलनाला बसले आहेत. यामुळे अण्णा हजारेंचं वजन साडेचार किलोनं घटलं आहे, तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे.
महाजनांच्या भेटीनंतर अण्णा हजारेंची पत्रकार परिषद
इतकी पत्र लिहिली, तेव्हा आता सरकारने चर्चा सुरु केली
कृषी मूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा नेमका कसा देणार, हे तपशीलवार देण्यास सांगितलं
कृषी हित कायदा, शेतकरी, मजुरांना पेन्शन मिळावी, या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा, मात्र केवळ तोंडी आश्वासन नको, यावर मी ठाम
प्रस्ताव काय येतो, त्यावर भूमिका ठरवणार, पण केवळ आश्वासनावर आंदोलन थांबणार नाही
उद्या दुपारी पुन्हा सरकार आपल्या आश्वासनांवर प्रस्ताव घेऊन येणार आहे, त्यानंतर ठरवू
राईट टू रिजेक्टबद्दलची मागणी मांडली, त्यावरही सरकारची भूमिका उद्या कळेल.
आपल्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु, ठोस उत्तराशिवाय माघार घेणार नाही
निवडणूक सुधारणांबाबत डेडलाईन दयायला हवी
जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न आणि निवडणुकीसंदर्भातल्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं सलग चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. 23 मार्चला शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी रामलीलावर उपोषणाला सुरुवात केली. 2011 च्या जनलोकपाल वेळी दिल्लीत अण्णांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला पण यंदा म्हणावी तशी गर्दी जमली नाही.
माध्यमांवर सरकारचा दबाव : अण्णा
आंदोलनाला गर्दी का दिसत नाही, यावरुन अण्णांनी सरकारवर निशाणा साधला. ''गेल्या आंदोलनात रामलीला मैदानावर 65 ते 70 कॅमेरे असायचे. यावेळी केवळ एक कॅमेरा असतो दिवसभर. आमच्या मागण्याच लोकांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. माध्यमांवर सरकारचा दबाव आहे,'' असा आरोप अण्णांनी केला.
''कृषी राज्यमंत्री आणि गिरीश महाजनांसोबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र कागदपत्र दाखवा, अशी अट त्यांना घातली. कागदपत्र घेऊन ते येणार होते. मात्र आले नाहीत. आज पुन्हा शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. काही ठोस निर्णय घेणार असाल तरच या,'' असं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं असल्याचं अण्णा म्हणाले.
अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचे प्रश्न
- लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या
- निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement