एक्स्प्लोर
प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात, सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला महिना उलटत असतानाच आणखी एक बातमी समोर येत आहे. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय झाला असून त्याची तयारी सुरु असल्याची माहिती सरकारतर्फे संसदेत देण्यात आली.
प्लास्टिक नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची जुळवाजुळव सुरु करण्यात आली आहे. प्लास्टिक किंवा पॉलिमरपासून चलनी नोटा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत लेखी स्वरुपात दिली आहे. कागदी नोटांच्या ऐवजी प्लास्टिक नोटा छापण्याचा प्रस्ताव आरबीआयने दिला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेने अनेक महिन्यांपासून प्लास्टिक करन्सी चलनात आणण्याची तयारी करत आहे. 10 रुपयांच्या 100 कोटी ( एक अब्ज) नोटा प्रायोगिक तत्त्वावर देशातील पाच शहरांमध्ये वितरित केल्या जातील, अशी माहिती फेब्रुवारी 2014 मध्ये सरकारने संसदेत दिली होती. भौगोलिक आणि हवामानदृष्ट्या वैविध्य असलेल्या कोची, मैसूर, जयपूर, शिमला, भुवनेश्वर या शहरांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार होती.
प्लास्टिकच्या नोटांचं सरासरी आयुष्य पाच वर्ष असतं. त्याचप्रमाणे त्या नोटांची नक्कल करणं कठीण असतं. त्याचप्रमाणे कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिकच्या नोटा स्वच्छ राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये प्लास्टिकच्या नोटा सर्वप्रथम चलनात आणण्यात आल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement