एक्स्प्लोर

गोव्यात ‘गोवा माइल्स’ लॉन्च, अॅपवरुन टॅक्सी बुक करता येणार

राज्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच गोवा माइल्सद्वारे परवडणाऱ्या आणि सरकारने मंजूर केलेल्या दरांत टॅक्सी आरक्षित करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरद्वारे गोवामाइल्स अॅप डाउनलोड करता येणार आहे.

पणजी : गोव्यात पहिल्यांदाच मोबाइल अॅपवर आधारित टॅक्सी सेवेचे अर्थात गोवा माइल्सचे लाँचिंग  मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज पर्वरी येथील सचिवालयात करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गोवा माइल्सची सेवा स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी महत्वाची ठरणार आहे. गोवा व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन- प्रवासात या सेवेमुळे क्रांतीकारी बदल होतील अशी अपेक्षा बाळगली जात आहे. तसेच या नव्या उपक्रमांतर्गत सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांचा फायदा होईल असा दावा पर्यटन खात्याने केला आहे. राज्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच गोवा माइल्सद्वारे परवडणाऱ्या आणि सरकारने मंजूर केलेल्या दरांत टॅक्सी आरक्षित करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरद्वारे गोवामाइल्स अॅप डाउनलोड करता येणार आहे. लाँचिंग नंतर बोलताना पर्रीकर म्हणाले, “या नव्या अॅप आधारित टॅक्सी सेवेमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना परवडणाऱ्या दरात भरपूर प्रवास करण्याची संधी देता येईल. विशेष म्हणजे, त्यांना गोव्यात आल्यापासून परत जाईपर्यंत परवडणाऱ्या दरांत ही सेवा वापरता येईल. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मी गोवा टुरिझमचे अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला भरपूर यश मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.” यावेळी बोलताना पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले, “गोव्यातील अॅपआधारित टॅक्सी सेवा वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणेल, ज्याचा या क्षेत्रातील सर्व घटकांना म्हणजेच टॅक्सी चालक, पर्यटक आणि स्थानिकांना फायदा होईल. मला खात्री आहे, की गोव्यातील पर्यटक टॅक्सी चालक आता या डिजिटल यंत्रणेत सहभागी होतील आणि पर्यायाने अशा प्रकारची यंत्रणा यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांच्या यादीत गोवा मागे राहाणार नाही.” पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटनची सुविधा! अॅपवर आधारित टॅक्सी सेवेच्या लाँचमुळे पर्यटकांना गोवामाइल्स सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे आहे हे सहज लक्षात येईल, कारण त्यांना केवळ एका मोबाइल अॅपद्वारे आरक्षण, देखरेख आणि पैसे भरणे अशा सर्व क्रिया करत येणार आहेत. ट्रॅकिंगसुद्धा अतिशय सोपे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांची राइड त्यांच्या सद्य आणि त्यापूर्वी आरक्षित केलेल्या राइडचे ट्रॅकिंग पाहाता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेस काही धोका असल्यास त्यात पॅनिक बटनाची सोयही दिलेली आहे. या सेवेचा टॅक्सी चालकांनाही फायदा होईल याची खबरदारी गोवा माइल्सने घेतली असून त्यानुसार भारतात इतरत्र व जगभरातील ट्रेंडनुसार त्यांच्या उत्पन्नावर शुल्क आकारले जाणार नाही. टॅक्सी चालकांना दैनंदिन पातळीवर पैसे मिळतील. हेच मोबाइल अॅप कर आणि विमा कारणांसाठी तसेच जवळच व्यवसाय शोधण्यासाठी वापरता येणार असून त्यामुळे प्रत्येक चालकाला उत्पन्न मिळवण्याची खात्री असेल. उत्पन्नाचा सारांश अॅपमध्येच पाहाता येईल. स्थानिक गोवन चालकांमध्ये व्यवसायाचे समान विभाजन केले जाईल आणि त्यांना काम करून जास्त पैसे मिळवता येतील व हीच गोष्ट त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देईल. पुढील काही स्टेप्समध्ये कॅब आरक्षित करा :
  • पिकअप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)
  • ड्रॉप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)
  • नकाशावर दिसत असलेल्या तुमच्या लोकेशनजवळच्या कॅब्ज/टॅक्सी पाहा
  • पैसे भरण्याचे विविध मार्ग – रोख पैसे भरा किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम, यूपीआय असे विविध कॅशलेस पर्याय वापरा.
  • वाहनाचा प्रकार निवडा आणि ‘कन्फर्म’ वर टॅप करा.
  • सोप्या पद्धतीने निवड करण्यासाठी तुम्हाला वाहनाचा प्रकार आणि दर दिसतील व त्यात तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा.
  • त्यानंतर तातडीने इतर तपशील जसे, की चालकाचे नाव, गाडीचा नंबर, गाडीचा प्रकार इत्यादी. चालकाला दिला जाणारा ओटीपी अपमध्येच असेल.
  • चालकाला ओटीपी दिल्यानंतर रिअल टाइममध्येच कॅब येण्याची व ड्रॉप केले जाण्याची वेळ पाहा.
  • तुमची ट्रिप संपल्यानंतर इन्व्हॉइसचा इतिहास लगेचच ‘माय राइड्स’मध्ये पाहाता येईल आणि आधीच्या ट्रिप्सची माहिती सध्याच्या ट्रिपच्या माहितीखाली दिलेली असेल.
  • भाडेशुल्क आणि राइडची वैशिष्ट्ये जाणून घ्या – आरक्षित करण्यासाठी भाडे आणि विविध वैशिष्ट्ये तपासता येतील.
  • शेअर – राइडचे तपशील तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करता येतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget