(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Wildfire : गोव्याच्या जंगलाला भीषण आग, सहा दिवसांपासून जळतेय जैवविविधता, इतिहासातील सर्वात भीषण आगीची नोंद
Goa Wildfire : 'गेल्या सहा दिवसांपासून गोव्यातील जंगलाला आग लागली असून ही काही अंशी आग आटोक्यात आणली आहे. परंतु, या आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता जळून खाक झाली आहे.
Goa Wildfire : गेल्या सहा दिवसांपासून गोव्यातील महादयी वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागली आहे आहे. या आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता जळून खाक झाली आहे. जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक अससेल्या पश्चिम घाटाचा हा विस्तीर्ण भाग राज्याच्या इतिहासातील सर्वात भीषण आगीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील ही आग विझत नाही. दुर्गम परिसर आणि खडी चढण असल्यामुळे जंगलातील आग विझवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळी ही आग विझवण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ लागू शकतो.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या सहा दिवसांपासून जंगलाला आग लागली असून आम्ही काही अंशी आग आटोक्यात आली आहे. या परिस्थितीत जर पुन्हा नवीन आग लागली नाही तर आम्ही आशा करतो की पुढील आठवड्याच्या सुरूवातीस आम्ही ती पूर्णपणे विझवू. टाईम्स आफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, वन विभागाने 14 मार्चपर्यंत इम्पॅक्ट असेसमेंट करण्याची मागणी केली आहे. यासोबतच विभागाने परिक्षेत्र अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सतर्कता वाढवण्याच्या आणि पर्यटक व स्थानिक लोकांना संरक्षित जंगलात जाण्यापासून रोखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
Goa Wildfire : गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी इशारा दिला होता
राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी ही आग मानवनिर्मित आपत्ती असल्याचा दावा केला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वन खात्यानेही वनरक्षकांकडून कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी सुरू केली आहे.
Goa Wildfire : सर्वात भीषण आग
माजी मुख्य वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहिती सांगितले की, 'मी 1977 पासून गोव्यात असून मी पाहिलेली ही सर्वात भीषण आग आहे. जगभरात मानवनिर्मित जंगलात आग लागल्याची नोंद नेहमीच होत असते. सदाहरित जंगलांमध्ये आग लागत नाही कारण ते ओलसर असतात. या आगीमागे होणाचा तरी हात असावा. अतिक्रमण वाढवणाऱ्या लोकांनी आग लावली असण्याची शक्यता आहे. आग लागण्यामागे हवामान बदल हे कारण असू शकत नाही.
गोव्यातील महादयी वन्यजीव अभयारण्यातील जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि वन विभागाच्या पथकांना आतापर्यंत अनेक ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. उत्तर गोव्यात असलेले महादयी वन्यजीव अभयारण्य हे समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातील अनेक भाग आगीमुळे प्रभावित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या