एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटकात भाजपचा रडीचा डाव?
कर्नाटकात भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएस सत्तेसाठी एकत्र येत आहेत. मात्र अशातच मोठा पक्ष असल्याने आम्हाला सत्ता स्थापन करायला मिळावी, असा दावा भाजपने करायला सुरुवात केली आहे.
मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएस सत्तेसाठी एकत्र येत आहेत. मात्र अशातच मोठा पक्ष असल्याने आम्हाला सत्ता स्थापन करायला मिळावी, असा दावा भाजपने करायला सुरुवात केली आहे.
त्याचवेळी विरोधकांनी भाजपला गोवा आणि मणिपूरची आठवण करुन दिली. गोवा आणि मणिपुरात भाजप मोठा पक्ष नसतानाही तिथे लहान-सहान पक्षांना एकत्र घेऊन सत्तेच्या खुर्चीवर भाजप विराजमान झालं आहे.
गोवा आणि मणिपुरात भाजप दुसऱ्या क्रमांकावर असूनही सरकार स्थापन केलं. मग तोच न्याय कर्नाटकात का नाही, असा प्रश्न आहे.
विरोधकांनी ज्या गोवा आणि मणिपूरमधील सत्तेच्या समीकरणांची उदाहरणं दिली, त्या राज्यांमध्ये निकालानंतर नेमकी काय स्थिती निर्माण झाली होती, यावर आपण एक नजर टाकूया :
गोव्यात काय झालं होतं?
गोवा विधानसभा 40 सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यात, विश्वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात दाखल होऊन पुन्हा निवडणूक लढवून भाजपचे आमदार झाले.
त्यामुळे भाजप आणि समर्थकांची एकूण संख्या 21 वर पोहोचली. तोच बहुमताचा आकडा होता.
विशेष म्हणजे, निवडणुकीआधी कोणत्याही पक्षाशी युती नसताना आणि निकालानंतर काँग्रेस मोठा पक्ष असतानाही, भाजपने लहान-सहान पक्षांना एकत्र करत, बहुमताचा आकडा पार करुन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. पर्ययाने गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झालं.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. त्यामुळे गोवा विधानसभेतही पर्रिकर सरकारने 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
मणिपूरमध्ये काय झालं?
मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 60 जागांपैकी 28 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ, भाजप 21, नागा पीपल फ्रंट – 4, नॅशनल पीपल्स पार्टी – 4, तृणमूल काँग्रेस -1, अपक्ष – 1, लोकजनशक्ती पार्टी – 1 असे पक्षीय बलाबल होते. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली.
मणिपुरात एनपीपी, एनपीएफ, एलजेपी आणि काँग्रेस सोडून आलेला एक आमदार, अशांची मोट बांधून भाजपने सत्ता स्थापन केली आणि भाजप नेते एन बिरेन सिंह यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली.
यावेळी भाजपने एनपीपी 4, एनपीएफ, एलजेपी प्रत्येकी एक आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement