एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एफडीएच्या धाडीनंतर गोव्यात मासळी बाजार बंद
31 जुलैपर्यंत गोव्यात मासेमारी बंदी असल्याने गोवेकरांना मासळीसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावं लागतं.
पणजी : अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीनंतर गोव्यात मासळी बाजार बंद करण्यात आला आहे. मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात परराज्यातून आलेल्या 17 ट्रकमधील मासळीची धाड टाकून केलेल्या तपासणीचा निषेध म्हणून मडगाव, पणजी आणि म्हापसा शहरातील मासळीचे घाऊक आणि किरकोळ बाजार बंद करण्यात आले आहेत. परिणामी गोव्यात मासळी संकट निर्माण झालं आहे.
गोव्यात सध्या मासेमारी बंद असल्याने बहुतेक सगळी मासळी शेजारील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधून आयात केली जाते. परराज्यातून आयात केलेली मासळी साठवून ठेवण्यासाठी आरोग्यास हानीकारक असे रसायन वापरले जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली.
त्यानंतर एफडीएच्या पथकाने आज पहाटे मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात परराज्यातून मासळी घेऊन आलेल्या 17 ट्रकमधील मासळीची तपासणी केली. त्यात आरोग्यास हानीकारक रसायन वापरल्याचं आढळून आलं. मासळी साठवून ठेवण्यासाठी Formalin नावाचे रसायन वापरले जात असल्याच्या बातम्या आणि स्थानिकांच्या तक्रारी आल्यानंतर आज पहाटे ही कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईचा निषेध म्हणून मडगाव, पणजी आणि म्हापसा येथील मासळीचे घाऊक आणि किरकोळ बाजार बंद ठेवल्यामुळे गोवेकरांचे हाल झाले. 31 जुलैपर्यंत गोव्यात मासेमारी बंदी असल्याने गोवेकरांना मासळीसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावं लागतं. आजचं प्रकरण चिघळले तर गोवेकरांचे आणखी हाल होणार आहेत. मडगावमधील मासळी विक्रेत्यांनी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement