ABP Opinion Poll : गोव्यात भाजप बाजी मारण्याची शक्यता
ABP C Voter Survey : यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही दिवसांत गोव्यात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे.
ABP CVoter Survey Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही दिवसांत गोव्यात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, आप आणि इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीनं (GFP) काँग्रेसशी (Congress) आघाडी केलीय. अशातच एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून गोव्यातील जनतेचा कौल जाणून घेतलाय. यासाठी गोव्यातील जनतेला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. या सर्व्हेत गोव्यात भाजपला 19 ते 30, आपला 5 ते 9, काँग्रेसला 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर गोव्यात भाजपला 32 टक्के, आपला 22.5 टक्के, कॉंग्रेसला 19.8, मगोपला 7.7 टक्के आणि इतर पक्षांना 18.1 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गोव्यात भाजपचा कसा बदलला कौल?
सप्टेंबर 2021 : 22-26
ऑक्टोबर 2021 : 24-28
नोव्हेंबर 2021 : 19-23
डिसेंबर 2021 : 17-21
जानेवारी 2022 : 19-23
गोव्यात आपचा कसा बदलला कौल?
सप्टेंबर 2021 : 4-8
ऑक्टोबर 2021 : 3-7
नोव्हेंबर 2021 : 3-7
डिसेंबर 2021 : 5-9
जानेवारी 2022 : 5-9
गोव्यात कॉंग्रेसचा कसा बदलला कौल?
सप्टेंबर 2021 : 3-7
ऑक्टोबर 2021 :1-5
नोव्हेंबर 2021 : 2-6
डिसेंबर 2021 : 4-8
जानेवारी 2022 : 4-8
सर्व्हेनुसार गोव्यात भाजपला 2017 च्या तुलनेत 8 जागांचा फायदा होणार आहे. तर आपला 7,कॉंग्रेसला 11, जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
फेव्हरेट मुख्यमंत्री कोण? या सर्व्हेमध्ये भाजपचे प्रमोद सांवत यांना 34 टक्के मते मिळाली आहे. तर आपचे उमेदवार 19 टक्के मते मिळाली आहे. तर भाजपचे विश्वजीत राणे 16 टक्के मते मिळाली आहे. कॉंग्रेसचे दिगंबर कामत यांना 9 टक्के तर
इतरांना 22 टक्के मते मिळाली आहे.
सूचना : आजचा ओपिनियन पोल सी-व्होटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 89 हजार 536 जणांची मतं जाणून घेतली आहेत. हा ओपिनियन पोल 12 डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकश सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.