Goa Assembly Elections : माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार : उत्पल पर्रिकर
Goa Assembly Elections 2022 : पणजी हाच माझा एकमेव पर्याय; उत्पल पर्रिकरांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.
Utpal Parrikar Exclusive : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. गोव्यात भाजपच्या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं दिला आहे. पण उत्पल पर्रिकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना उत्पल पर्रिकर यांनी अन्य जागेवरून लढण्याचा कोणताही विचार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. लवकरच आपली भूमिका जाहीर करू, असं पर्रिकरांनी सांगितलं आहे.
गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय आणि त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजपनं बिचोलीमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिलाय. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण तिथून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे पणजी ऐवजी बिचोली मतदारसंघाचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार : उत्पल पर्रिकर
यासंदर्भात बोलताना उत्पल पर्रिकर यांनी एबीपी माझाला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की." , अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी भाजपची गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी
गोवा विधानसभा (Goa Assembly Elections 2022) निवडणुकींसाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजपनं अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण तिथून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या 10 वर्षांमध्ये गोव्यात भाजपनं स्थिर सरकार आणि विकासाचा मुलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपनं संपवली होती. तसेच, भाजपनं गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणलं.पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्तापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत भाजपनं गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BJP Candidates List : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली
- Goa Election 2022 : 'देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी' : संजय राऊत
- AAP, Goa CM Face: गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित, अमित पालेकरांच्या नावाची घोषणा
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Election Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, त्यात 5 राज्यात निवडणुका, नो रॅली, नो सभा, गाईडलाईन्स नेमक्या काय?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा