एक्स्प्लोर

BJP Candidates List : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली

BJP Goa Assembly Elections Candidates List : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं गुरुवारी उमेदवारांची नावं जाहीर केली.

BJP Goa Candidates List : गोवा विधानसभा (Goa Assembly Elections 2022) निवडणुकींसाठी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पणजीमधून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रिकरांना भाजपनं अन्य दोन जागांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. पण तिथून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पणजी ऐवजी अन्य दोन जागांपैकी एका जागेचा पर्याय उत्पल पर्रिकर स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या 10 वर्षांमध्ये गोव्यात भाजपनं स्थिर सरकार आणि विकासाचा मुलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपनं संपवली होती. तसेच, भाजपनं गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणलं.पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्तापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत भाजपनं गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे."

BJP Candidates List : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली

"एकीकडे जिथे भाजप गोव्याच्या विकासासाठी संघर्ष करतेय. तिथे दुसरीकडे इतर पक्ष केवळ भाजपसोबत संघर्ष करत आहे. टीएमसी गोव्यामध्ये यंदा निवडणूक लढवणार आहे. त्यांना सूटकेसच्या माध्यमातून पक्ष वाढवायचा आहे. टीएमसीची भूमिका हिंदूविरोधी आणि राष्ट्रवादविरोधी आहे.", असं ते म्हणाले. 

माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार : उत्पल पर्रिकर 

"माझी भूमिका ठाम आहे. मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही. यापुढे माझी भूमिका काय असेल ते मी लवकरच जाहीर करेन. पण पणजी हाच माझा एकमेव पर्याय आहे हे नक्की." , अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी भाजपची गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget