एक्स्प्लोर
Advertisement
मिस्ड कॉल द्या, तुमच्या पीएफची रक्कम जाणून घ्या!
आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकणार आहात.
मुंबई: आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे, नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती मिळवणं आता सहज शक्य होणार आहे.
कारण आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकणार आहात.
त्यासाठी 011-2290 1406 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल.
मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.
तुमचा मोबाईल नंबर पीएफ अकाऊंटला कसा लिंक करायचा?
- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा
- उजव्या बाजूला खालील बाजूस Activate UAN वर क्लिक
- तिथे UAN नंबर टाका. हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल.
- यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा
- त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येईल.
- मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता.
- तसंच 011- 2290 1406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement