एक्स्प्लोर

दिल्ली हादरली! स्कूटीला धडक देऊन मुलीला सात -आठ किलोमीटर फरफटत नेलं 

Delhi Car Accident : एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाने फरफटत नेले आहे. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

Delhi Car Accident : दिल्लीतील कांजवाला येथे एक अतीशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाने फरफटत नेले आहे. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मृत तरूणी ही तिच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिच्या कुटुंबात दोन लहान भाऊ आणि बहिणी आहेत. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई आजारी असते, अशी माहिती मिळाली आहे. 

दिल्लीचे डीसीपी ओटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना पहाटे माहिती मिळाली की एका वाहनात एक मृतदेह लटकला आहे, हे वाहन कुतुबगढच्या दिशेने जात आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाहनाचा शोध सुरू केला. त्यावेली कांजवाला परिसरात एका मुलीचा विवस्त्र मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेला घटनास्थळी पाचारण करून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी कारचा शोध घेतल्यानंतर ती कार सुलतानपुरी येथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना मृत मुलीची स्कूटीही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर स्कूटीवर जाणारी एक मुलगी वाहनाच्या चाकात अडकून वाहन तिला लांबपर्यंत ओढत नेल्याचे आढळून आले.

Delhi Car Accident : लांब ओढत नेहल्याने फाटले कपडे

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याचे दिसत आहे. हा अपघातच आहे की घातपात याबाबत पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक माहितीत पोलिसांनी या प्रकरणाला अपघात असल्याचे म्हटले आहे. तपासात समोर आले की, अपघातानंतर मुलीला गाडीने लांबपर्यंत फरफटत नेल्यामुळे तिचे तिचे कपडे फाटले. 

Delhi Car Accident : संशयित धद्यधुंद अवस्थेत 

या घटनेतील आरोपी मुले मद्यधुंद अवस्थेत होती. हे सर्व जण दिल्लीतील मुरथल सोनीपत येथून मंगोलपुरी येथील त्यांच्या घरी परतत होते. यावेळी सुलतानपुरीजवळ त्यांच्या गाडीने मुलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यामुळे मुलगी गाडीखाली अडकली आणि आरोपी मुलांनी तिला 7 ते 8 किलोमीटरपर्यंत ओढत नेलं.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्याने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून काम करून ही मुलगी काल रात्री उशिरा घरी परतत असल्याची माहिती आहे. त्याच दरम्यान तिचा अपघात झाला. गाडी चालवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमित असे या तरूणाचे नाव आहे.  

Delhi Car Accident : महिला आयोगाकडून दखल 

दिल्लीतरी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. रस्त्यावर नग्नअवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आले आहे. या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना समन्स पाठवले आहे. नर्व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी काय पावले उचलली होती. एवढी मोठी घटना होत असताना त्यांना याबाबत कोणतीच माहिती कशी नव्हती? एवढ्या लांबपर्यंत मुलीला फरफटत नेलं जातं. परंतु, एवढ्या अंतरात एकही चेकपोस्ट नाही. दारू पिऊन हे तरूण गाडी कसे चालवत होते. त्यामुळे पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत असल्याचे मालीवाल यांनी म्हटले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget