एक्स्प्लोर

देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरची बॅट मैदानावर जशी तळपते, तसाच तो ट्विटरवरही बेधडक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुकमामध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गंभीरने पुन्हा तोंड उघडलं आहे. 'देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही', अशा शब्दात गंभीरने निशाणा साधला आहे. 'छत्तीसगड, काश्मीर, ईशान्य भारत... या कानठळ्या पुरेशा आहेत की आपण बहिरे झालो आहोत? आपल्या देशातील नागरिकांचा जीव इतकाही स्वस्त नाही, कोणाला तरी याची किंमत चुकवावी लागेल.' या शब्दात गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे. https://twitter.com/GautamGambhir/status/856558557768155136 यापूर्वी काश्मीरमधील जवानासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवरही गंभीरने बोट ठेवलं होतं. 'माझ्या जवानांवर हात उगारल्याच्या बदल्यात कमीत कमी शंभर आत्मघातींचा जीव जाईल. ज्यांना स्वातंत्र्य हवं आहे, त्यांनी चालतं व्हावं. काश्मिर आमचं आहे.' असं ट्वीट त्याने केलं होतं. गौतम गंभीर आयपीलच्या दहाव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात CRPF च्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते. 25 जवानांच्या मृत्यूमागे कोण? नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील 25 जवानांच्या मृत्यूमागे कुख्यात नक्षली नेता हिडमा याचा हात असल्याचं बोललं जात आहे. हिडमाने जवळपास 300 नक्षलवाद्यांसह मिळून हा हल्ला केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पापल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला (PLGA) संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना बुरकापाल आणि चिंतागुफा भागात सक्रिय असते. कोण आहे हिडमा? 25 वर्षीय हिडमा हा पीएलजीएची पहिली बटालियन (PLGA 1) चा प्रमुख आहे. तो सुकमा जिल्ह्यातील पालोडी गावाचा रहिवासी आहे. घातपाताने हल्ला करणारा मास्टरमाईंड अशी हिडमाची ओळख आहे. हिडमा आणि त्याच्या बटालियनने आतापर्यंत CRPF वर अनेक मोठे हल्ले केले आहेत. दंतेवाडातील ताडमेटलामध्ये 2010 साली झालेल्या हल्ल्यात एक हजार नक्षलवाद्यांनी 76 जवानांची हत्या केली होती. हिडमा ग्रुपने यापूर्वीही मोठे हल्ले केले आहेत. 23 मार्च 2013 रोजी दरभातील झीरम घाटीत काँग्रेस परिवर्तन रॅलीवर करण्यात आलेल्या हल्ल्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह 31 जणांची हत्या करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी

सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget