एक्स्प्लोर
राहुल गांधी ते मोदी, वाजपेयींना भेटण्यासाठी दिग्गज 'एम्स'मध्ये
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
मोदी जवळपास 55 मिनिटे रुग्णालयात होते. त्यानंतर लगेच राजनाथ सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही रुग्णालयात येऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
‘एम्स’मध्ये वाजपेयींच्या तपासणीसाठी डॉक्टरांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून येत्या दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, असं ‘एम्स’कडून सांगण्यात आलं आहे.
वाजपेयींना आज रात्री आठ वाजता डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहितीही अगोदर समोर आली होती. मात्र दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 2009 सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ते ग्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपच्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement