एक्स्प्लोर

2nd December In History: गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती, क्युबामध्ये क्रांती करून फिडेल कॅस्ट्रोने सत्ता हाती घेतली; आज इतिहासात

2nd December In History: महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले (A. R. Antulay) यांचे 2 डिसेंबर 2014 रोजी निधन झाले. 

2nd December In History : आजचा दिवस हा जागतिक इतिहासाचाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवसी इतिहासात नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. तर दुसरीकडे क्युबामध्ये क्रांती करून फिडेल कॅस्ट्रोने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यासह इतिहासातील आजच्या दिवसाच्या इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे पाहू, 

1804- नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला

जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन (Napoleon Bonaparte) हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद हस्तगत केले. नेपोलियनने 18व्या शतकाच्या शेवटीपर्यंत फ्रान्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक देशांना परास्त केले. आजच्याच दिवसी म्हणजे 2 डिसेंबर 1804 रोजी नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. 

1911- मुंबईत गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती 

गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) ही ब्रिटिशकालीन भारतातील एक भव्य इमारत आहे. 1911 साली  ब्रिटनचा राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. त्याची निर्मिती 2 डिसेंबर 1911 साली करण्यात आली. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 26 मीटर (85 फूट) उंचीची आहे.

1937- मनोहर जोशी यांचा जन्मदिन 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईतील नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल उल्लेखनीय आहे. 1995 साली राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. तसेच लोकसभेचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 

1942- एन्रिको फर्मी याने चेन रिअॅक्शन नियंत्रित केली 

एन्रिको फर्मी (Enrico Fermi) या इटालियन-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञाने आजच्याच दिवशी शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची श्रृंखला अभिक्रिया म्हणजे चेन रिअॅक्शन नियंत्रित करण्यात यश प्राप्त केलं. त्याच्या या शोधामुळे अणुउर्जेचा शोध लागला. एन्रिको फर्मी याला 1938 सालच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

1959- बोमन इराणी यांचा जन्म 

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईमधील एका पारशी कुटुंबात झाला. पदवी घेतल्यानंतर बोमन इराणीने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. यानंतर तो आपल्या आईबरोबर दक्षिण मुंबईतील नोव्हेल्टी सिनेमा आणि अप्सरा सिनेमा यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने दादरमध्ये अंकल चिप्सचे एक दुकानही काढले. पण धंद्यात नुकसान झाल्याने 1986 च्या सुमारास ते बंद केले.नंतर तो व्यावसायिक छायाचित्रकार बनला. 

1971- संयुक्त अरब अमिरातीला ब्रिटनपासून स्वातंत्र्य 

संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates - UAE) हा पश्चिम आशियातील एक अरब देश असून 1971 साली त्याने ब्रिटनपासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती सात अमिराती एकत्र येऊन झाली आहे. अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-कुवैन, रस-अल-खैमा आणि फुजैरा या सात अमिरातीपासून संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. 

1976- फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष 

क्युबाचा महान क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोने (Fidel Castro) आजच्याच दिवशी, 2 डिसेंबर 1976 रोजी क्युबाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. क्युबामध्ये साम्यवादी विचारसरणीने क्रांती केल्यानंतर तो 1959 ते 1976 या काळात त्या देशाचा पंतप्रधान होता. त्यानंतर 1976 ते 2008 सालापर्यंत त्याने अध्यक्षपद सांभाळलं. साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या आधारे फिडेल कॅस्ट्रो याने क्युबात क्रांती केली. त्याने स्थापन केलेल्या  ‘26 जुलै मूव्हमेंट’ या संघटनेला तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि क्युबात त्याच्या नेतृत्वाखाली नव्या साम्यवादी विचारसरणीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यानं तब्बल 47 वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. त्याच्या काळात साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक पाऊले उचलली. 

अमेरिकेने जवळपास 45 वर्षांहून जास्त काळ क्युबावर आर्थिक निर्बंध लादले. तरीही फिडेल कॅस्ट्रो डगमगला नाही. अमेरिकेची गुप्तहेर संघटना असलेल्या सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला अनेकदा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरला. 

1988- बेनिझिर भुट्टो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान 

आजच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 1988 रोजी बेनिझिर भुट्टो (Benazir Bhutto) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. बेनिझिर भुट्टो या पाकिस्तानच्या 1988 ते 1990 आणि 1993 ते 1996 या दरम्यान दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला.

1989- भारताचे सातवे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा शपथविधी 

विश्वनाथ प्रताप सिंह (Vishwanath Pratap Singh) यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. व्हीपी सिंह यांनी 2 डिसेंबर 1989 ते 10  नोव्हेंबर 1990  या काळात, एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. सिंह यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच कारकिर्दीत काश्मिरी अतिरेक्यांनी तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण केले. त्यांच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

पंतप्रधान व्ही पी सिंह यांनी देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशात ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं.

1993- ड्रग किंग पाबोला एस्कोबार याचे निधन 

कोलंबियाचा कुख्यात ड्रग किंग अशी ओळख असलेल्या पाबोला एस्कोबार (Pablo Escobar) याचे आजच्या दिवशी, 2 डिसेंबर 1993 रोजी निधन झालं. कोलंबियातील मेडेलिन कार्टेल या गँगची निर्मिती त्याने केली. जगभरात ड्रगचे जाळे विणण्यात तो यशस्वी झाला. कोकेनच्या व्यापारात त्याचं वर्चस्व होतं. त्याच्या माध्यमातून पाबोलो एस्कोबार याने तब्बल 25 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवल्याचं सांगितलं जातंय. तो त्याच्या आलिशान लाईफस्टाईल आणि दहशतीसाठी प्रसिद्ध होता. 

1999- फेमा कायदा लोकसभेत मंजूर

परकीय पैशाचे व्यवस्थापन आणि देखभालीसाठी परकीय चलन विनिमय कायदा म्हणजे फेमा, foreign exchange management act(FEMA) हा कायदा करण्यात आला. 2 डिसेंबर 1999 रोजी हा कायदा लोकसभेत पारित करण्यात आला. त्या आधी आपल्या देशात फेरा हा कायदा अस्तित्वात होता. हा कायदा मुख्यतः नियमित आणि उदारमतवादी अर्थव्यवस्था भारतामध्ये आणण्यासाठी करण्यात आला.  

2014- महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन 

राज्याचे आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले (A. R. Antulay) यांचे 2 डिसेंबर 2014 रोजी निधन झाले. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री म्हणून काम केलं. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये 2006 ते 2009 दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री होते. 2004 साली 14व्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना रायगड मतदारसंघामधून अनंत गीते यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. 2 डिसेंबर 2014 रोजी अंतुले यांचे मुत्रपिंडाच्या विकाराने मुंबई येथे निधन झाले.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget