एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिहारमध्ये चारा घोटाळ्याची महत्त्वाची फाईल गायब
पाटणा: बिहारमधील सर्वात जास्त गाजलेल्या, आणि या प्रकरणात आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाची हावा खावी लागलेल्या, चारा घोटाळ्याची फाईल गायब झाली आहे. पाटणामधील पशु संवर्धन आणि मत्स्योत्पादन विभागाच्या कार्यालायातून ही फाईल गायब झाली आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
ही फाईल पैशांच्या अफरातफरीशी संबंधित असून यासंदर्भात पाटण्याच्या सचिवालय पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची ही घटना तीन आठवड्यापूर्वी घडली असून तब्बल वीस दिवसांनी यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांची आरजेडी आणि नितीश कुमार यांची संयुक्त जनता दल यांचे आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे या फाईल चोरी प्रकरणावरून सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
१९९६ साली हा चारा घोटाळा उघडकीस आल्याने १९९७ साली लालूप्रसाद यादव यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर तत्कालिन झारखंड विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. २०१३ साली त्यांना अटक करून तरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर ते जामीनावर बाहेर आले. पण न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement