(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'हम भी किसी से कम नही', देशाच्या लष्करात आता पहिल्यांदाच महिला मिलिटरी पोलिसांच्या बॅचचा समावेश
बंगळुरुतील द्रोणाचार्य परेड ग्राउंडवर शनिवारी पहिल्या महिला मिलिटरी पोलिसांच्या (Women Military Police) बॅचचे परेड आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे या बॅचचा आता लष्करात समावेश झाला आहे.
बंगळुरु : देशाच्या लष्करामध्ये पहिल्यांदाच महिला मिलिटरी पोलिसांचा समावेश झाला आहे. शनिवारी बंगळुरुतील द्रोणाचार्य परेड ग्राउंडवर या बॅचचे परेड आयोजन करण्यात आलं होतं. या पहिल्या महिला मिलिटरी बॅचमध्ये एकूण 83 महिला आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन छोट्या प्रमाणात करण्यात आलं होतं आणि यावेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन करण्यात आलं आहे.
The Corps of Military Police Centre & School (CMP C &S) at #Bengaluru held the attestation parade of the first batch of 83 #Women soldiers at the #Dronacharya Parade Ground.
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 8, 2021
We welcome these valiant Soldiers to the #IndianArmy.#IndianArmy#StrongAndCapable pic.twitter.com/jEZbhhR072
देशातील या पहिल्या महिला मिलिटरी पोलिसांच्या बॅचला 61 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, प्रोवेस्ट ट्रेनिंग तसेच पोलीस ड्युटीचा समावेश आहे. तसेच या बॅचला युद्धातील कैद्यांना व्यवस्थापन, ड्रायव्हिंग तसेच इतर काही कौशल्यांचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या दरम्यान सिग्नल कम्युनिकेशनचे प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. भारतीय लष्करासाठी ही एक निर्णायक घटना असेल.
Karnataka: First batch of women Military Police inducted into the Indian Army. Corps of Military Police Centre & School at Bengaluru held the attestation parade of the first batch of 83 women soldiers at the Dronacharya Parade Ground today. pic.twitter.com/KS7daHWjm4
— ANI (@ANI) May 8, 2021
या परेडच्या आयोजनानंतर सिएमपी सेंटरच्या (The Corps of Military Police Centre) प्रमुखांनी या बॅचला शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या स्तरावर करण्यात येणार होतं. पण कर्नाटकातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन छोट्या स्तरावर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान महिला मिलिटरी पोलीस बॅचच्या महिलांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
महत्वाच्या बातम्या :
- कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोविड रिपोर्ट नको; रुग्णांची अडवणूक करता येणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश
- लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतर, कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक; Bharat Biotech च्या सह-सस्थापिका सुचित्रा इला यांचं मत
- मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीका, आक्षेपार्ह प्रतिक्रिया हटवण्यास प्राधान्य; लँसेटमधून ताशेरे