एक्स्प्लोर

कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोविड रिपोर्ट नको; रुग्णांची अडवणूक करता येणार नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

Coronavirus : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर अॅडमिशन ऑफ कोविड पेशंट यात बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे. 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोनाचा रिपोर्ट अनिवार्य नसणार आहे. कोरोना रिपोर्टसाठी कोणत्याही रुग्णाची अडवणूक करता येणार नाही, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. बऱ्याचदा कोरोनाची लक्षणं दिसून येतात, पण कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होता येत नाही. तसेच अनेकदा आरटीपीसीआर रिपोर्ट नेगेटिव्ह येतो, परंतु, सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येतो, अशा रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी नॅशनल पॉलिसी फॉर अॅडमिशन ऑफ कोविड पेशंट यात बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश जारी : 

  • कोणत्याही कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे. एक संशयित रुग्ण म्हणून  CCC, DCHC किंवा DHC अशा संशयित वॉर्डमध्ये दाखल केलं जाऊ शकतं. 
  • रुग्णांना त्रास होत असल्यास त्याला दाखल करुन उपचार देण्यासाठी नाही म्हणता येणार नाही. यामध्ये ऑक्सिजन किंवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे, जरी रुग्ण दुसऱ्या शहरातील असेल तरी त्याला उपचार देणं टाळता येणार नाही. 
  • कोणत्याही रुग्णाकडे ओळख पत्र नाही म्हणून त्याला उपचार देणं टाळता येणार नाही. 
  • रुग्णालयात प्रवेश आवश्यकतेनुसार मिळणं गरजेचं आहे. ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांनाच बेड उपलब्ध करुन देण्यात यावा. 
  • https://www.mohfw.gov.in/pdf/ReviseddischargePolicyforCOVID19.pdf मध्ये सांगण्यात आल्यानुसार, रुग्णांना डिस्चार्च दिला जावा. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
जिंकली टीम इंडिया, पण अभिनंदन आशिष शेलारांचं, सभागृहात हल्लाबोल, विरोधकांचा सभात्याग
Embed widget